Thursday, September 27, 2012

Black Peas Curry Recipe | काळ्या वाटाण्याची आमटी

Kala vatana amti recipe in marathi
साहित्य :
 • १ कप काळा वाटणा 
 • (१/४ कप ओलं खोबऱ्याचे तुकडे  + ५-६ लसून पाकळ्या  + १ इंच आलं+ थोड पाणी ) पेस्ट
 • २  बारीक कापलेले कांदे 
 • १ बारीक कापलेला Tomato 
 • १/२ टीस्पून जीर 
 • १/२ टीस्पून मोहरी 
 • १/४ टीस्पून हिंग 
 • थोडा कढीपत्ता  
 • १ टीस्पून लाल तिखट (आवडीनुसार)
 • १ टीस्पून गरम मसाला (आवडीनुसार )
 • १/४ टीस्पून हळद  
 • मीठ चवीनुसार  
 • थोडीशी बारीक कापलेली कोथिबीर   
कृती : 
 1. काळा वाटणा ७-८ तास भिजवत ठेवून नंतर धुवून कुकर मध्ये मीठ, २ कप पाणी टाकून शिजवून घ्या. जास्तीच पाणी फेकू नका. (जर वाटाण्याला मोड आणायचे असतील तर भिजवून झाले की  एका कपड्यात ५-७ तास बांधून ठेवा)
 2. एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जीर, हिंग, कढीपत्त्याची फोडणी घाला. जीर तडतडले की त्यात कांदा टाकून गुलाबी होऊ पर्यत परता मग त्यात (आलं+लसून +खोबर ) पेस्ट घाला.
 3. कांदा आणि पेस्ट ५ मिनिटे परता मग त्यात लाल तिखट, गरम मसाला, हळद, Tomato, किंचित मीठ घालून परता नंतर ५-७ मिनिटे झाकण ठेवून एक वाफ काढा. मसाल्याला तेल सुटयाला लागल की  त्यात वाटण्यामधले थोडं पाणी घाला आणि मसाला एकजीव करून ५ मिनिटे मसाला शिजू दया.
 4. नंतर त्यात काळा वाटाणा आणि उरलेलं पाणी (पाणी कमी असेल तर थोड साध पाणी टाका) टाकून एक उकळ आणा.
 5. सर्व्ह करताना वरून कोथिंबीर घाला. ही आमटी आंबोळी किंवा डोसा सोबत खाल्यास छान लागते.
टीप :
ओलं खोबरं ऐवजी सुक खोबर पण वापरता येईल. फक्त सुक खोबर तव्यावर भाजून घ्या मग पेस्ट करा.

Sabudana Khichdi Recipe | Fast Recipe

साहित्य :
sabudana khichdi recipe in marathi
 • १  कप साबुदाणा 
 • १  बटाटा बारीक काप केलेला 
 • ३ टेबलस्पून शेंगदाणा कूट 
 • ३ टेबलस्पून खवलेले ओल खोबर 
 • ३ बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या 
 • १/२ टीस्पून जीर  
 • १ टीस्पून साखर 
 • मीठ चवीनुसार 
 • २ टीस्पून तूप 
 • १ टेबलस्पून लिंबूचा रस 
 • बारीक कापलेली कोथिंबीर (आवडत असल्यास)
कृती :
 1. प्रथम साबुदाणा २-३ वेळा पाण्याने धुवून ३/४ कप पाणी टाकून ५-६ तास भिजवत ठेवा. साबुदाणा नीट भिजला की तो हाताने मोकळा करून घ्या.
 2. नंतर त्यात मीठ, साखर, शेंगदाण्याचा कूट घालून साबुदाणा एकजीव करून घ्या.
 3. एका कढईत तूप गरम करून त्यात जीराची फोडणी घाला, जीर तडतडले की त्यात मिरच्या, बटाटाचे काप आणि थोड मीठ टाका आणि नीट परतून झाकण ठेवून एक वाफ आणा म्हणजे बटाटा शिजेल.
 4. आता त्यात साबुदाणा टाकून परतून घ्या आणि पुन्हा झाकण ठेवून एक वाफ काढा.
 5. वाफ आली की त्यात कोथिबीर, ओलं खोबर आणि लिंबू रस टाकून नीट एकजीव करा. गरमागरम सर्व्ह करा, दही किंवा लिंबाच्या गोड लोणच्या सोबत.

Wednesday, September 26, 2012

Panner Sweet Corn Barfi Recipe

साहित्य :
Paneer Sweet Corn Barfi recipe in marathi
 •  स्वीट कॉर्न  १/२ वाटी 
 • पनीर १/२ वाटी (किसून बारीक केलेले)
 • ओलं खोबर खवलेले १/२ वाटी 
 • साखर १/४ वाटी 
 • गूळ १ वाटी (आवडीनुसार)
 • वेलची पूड १/२ टीस्पून 
 • तूप ३-४ टीस्पून 
 • काजू- बदामचे बारीक पावडर (मिक्सरमध्ये करून घेणे )
 • सजवण्यासाठी मनुके 
कृती :
 1. प्रथम स्वीट कॉर्न मिक्सर मधून वाटून पेस्ट करून घ्या ( पाणी अजिबात घालू नका). मग एका नॉन स्टिक कढईत तूप गरम करून त्यात स्वीट कॉर्न  पेस्ट १०-१५ मिनिटे परतून घ्या.
 2. मग त्यात पनीर घालून ५-१० मिनिटे परतून घ्या. नंतर त्यात ओलं खोबर, गूळ, साखर घाला. मिश्रण नीट एकजीव करून १५-२० मिनिटे परता.
 3. त्यात वेलची पूड घालून मिश्रण एकजीव करा आणि आच घालवा. एका ताटाला तूपाच हात लावून मिश्रण पसरून थंड करण्यास ठेवा. त्यावर काजू -बदामची पावडर टाका. थोड थंड (Room Temperature ) झाले की फ्रीजमध्ये १ तास ठेवा.
 4. नंतर त्याच्या वड्या पाडा आणि सर्व्ह करताना मनुकाने सजवा. 

टीप :
जर पनीर घरी नसेल आणि दूध नासलं/ फाटलं असेल तर पनीर ऐवजी ते वापरू शकता. त्यातील पाणी काढून टाका आणि १५-२० मिनिटे कपडयात बांधून ठेवा. 

Sunday, September 23, 2012

Soya Bean Chunks Gravy Recipe | सोयाबीनची भाजी

Soya Bean Recipe


साहित्य:
 • सोयाबीन १०० ग्रॅम 
 • ६ बारीक चिरलेले कांदे 
 • अर्धी वाटी ओले खोबरे 
 • गरम मसाला 
 • आले-लसणाची पेस्ट  
 • कोथिंबीर 
 • हळद 
 • २ टी स्पून तिखट 
 • २ मोठे tomato  
 • जिरे 
 • अर्धी वाटी तेल 
 • मीठ 

कृती:

 1. प्रथम सोयाबीन १५ मिनिटे पाण्यात भिजवून ठेवावे. नंतर ते चांगले धुऊन त्यातून फेसाळ पाणी काढून घ्यावे.
 2. नंतर कुकर मध्ये थोडा पाणी टाकून त्यात धुतलेले सोयाबीन टाका आणि २ शिट्या काढून घ्या.
 3. २ शिट्या काढून झाल्यानंतर एका पातेल्यात सोयाबीन काढून घ्यावेत आणि ते पुन्हा पाण्याखाली धुऊन घ्यावेत.
 4. नंतर कुकरमध्ये १ छोटी अर्धी वाटी तेल फोडणीसाठी टाकावे. नंतर  त्यात १ टी-स्पून जिरे, बारीक चिरलेले कांदे गुलाबी होयीपर्यंत परतून घ्यावे.
 5. त्यात आले-लसणाची पेस्ट, कांदा-खोबऱ्याचे वाटण, बारीक चिरलेले tomato, हळद, चवीनुसार मीठ व  २ टी-स्पून तिखट व  धुतलेले सोयाबीन टाकून एकजीव होयीपर्यंत चांगले परतावे.
 6. मिश्रण एकजीव झाल्यावर एक मोठी वाटी पाणी टाकून २ शिट्या काढून घ्यावे.
 7. कुकर थंड झाल्यावर भाजी काढून त्यावर थोडी कोथिंबीर टाकून serve करावे.    

Friday, September 21, 2012

Mango Modak Recipe | आंबा मोदक

Mango Modak Recipe in marathiसाहित्य: 
 • १ वाटी आंबरस 
 • १ नारळ 
 • १ लहान वाटी गुळ 
 • वेलची पावडर 
 • पाव किलो तांदळाचे पीठ 
कृती:
 1. १ नारळाचे खोबरे खणून त्यात आंबरस, गुळ, वेलची पूड घाला.
 2. नंतर त्याचे सारण करून घ्या.
 3. त्या नंतर एका पातेल्यात २ वाटी पाणी उकळून घ्या आणि पाणी उकल्यावर त्यात चवीनुसार मीठ,  १/२ चमचा तूप,१/२ वाटी आंबरस व तांदलाचे पीठ घालून घोटून घ्यावे व २ मिनिटे झाकण लावून मंद आंचेवर ठेवून आंच बंद करावी. 
 4. नंतर पीठ मळून घ्यावे.
 5. पीठाचे लहान गोळे करून घेऊन त्यात सारण भरून घ्या आणि मोदक तयार करून १० मिनिटे उकडण्यास ठेवावे.

Tuesday, September 18, 2012

Ukadiche Modak Recipe | उकडीचे मोदक

साहित्य :
Ukadiche Modak Recipe in marathi
 • २ वाट्या तांदूळ पिठी 
 • १ मोठा नारळ ( खवलेला )
 • २ टीस्पून तूप 
 • १/२ टीस्पून मीठ 
 • दीड वाटी गूळ (किसून घेतलेला/ बारीक करून घेतलेला)
 • १/२ टीस्पून वेलची पूड
 • किंचित जायफळ पूड 
 • २ टीस्पून खसखस (भाजून घेतलेली)
 • २ वाट्या पाणी
 •  सुका मेवा (Dry Fruits) -(आवडत असल्यास)
कृती :
 1. उकडीसाठी : २ वाट्या पाणी उकळत ठेवावे. त्यात मीठ  घालावे व उकळी आल्यावर तांदळाची पिठी घाला. उलटनीने ढवळून झाकण ठेवून २-३ वाफा आणून आच घालवा. ५ मिनिटे झाकण घालून तसच ठेवा नंतर परातीत थोड थोड घेवून छान मळून घ्या.
 2. सारणासाठी : खवलेले नारळ एका कढईत ५ मिनिटे परता, नंतर  त्यात १ टीस्पून तूप, गूळ टाका. गूळ विरघळला की आच काढा आणि त्यात खसखस आणि वेलची पूड, जायफळ पूड, सुका मेवा टाका मिश्रण एकजीव करा.
 3. आता मोदक करण्यासाठी उकडीचा लिंबाएवढा गोळा घेऊन तुपाचा हाताने त्याची वाटी करून त्यात २ चमचे सारण भरून कडेने चुण्या घालत तोंड बंद करा. असे सगळे मोदक करून ओल्या फडक्याखाली झाकून ठेवा. मग मोदक पात्रात किंवा इडली पात्रात ठेवून वाफवा. मध्यम आचेवर उकडण्यास १०-१२ मिनिटे ठेवा. 
टीप :
  सकाळचे मोदक पुन्हा गरम करताना पाणी बुचकळून/शिंपडून मग उकडावे, परत ताज्यासारखे होतील.

Coconut Barfi Recipe


साहित्य :
  Dessicated Coconut Barfi Recipe in marahti
 •  पाव  किलो डेसिकेट कोकोनट 
 •  १०० ग्राम मावा 
 •  १ १/२ वाटी साखर 
 • १/२ वाटी दूध 
 • १-२ टीस्पून तूप 
 • १ टीस्पून वेलची पूड 
 • बदामचे काप 
कृती :
 1. प्रथम नॉनस्टिक कढईत तूप टाकून त्यात डेसिकेट कोकोनट १० मिनिटे मंद आचेवर (डेसिकेट कोकोनट मंद आचेवर परता नाही कर ते करपू शकत) परतून घ्या आणि एका बाउलमध्ये काढा .
 2. नंतर कढईत मावा ५ मिनिटे परतून त्यात दूध, साखर टाकून ढवळा. 
 3. साखर विरघळी की त्यात डेसिकेट कोकोनट टाकून नीट मंद आचेवर परतत राहा जोपर्यत मिश्रण घट्ट होत नाही. मिश्रण घट्ट झाले की आच काढा. त्यात वेलची पूड टाका आणि मिश्रण पुन्हा एकदा एकजीव करा.
 4. एका पसरत ताटाला तूपाच हात लावून त्यावर हे मिश्रण पसरवा आणि सुरीने वड्या पाडून त्यावर बदामचे काप ठेवा. मिश्रण थंड झाले की वड्या सर्व्हिंग बाउल काढा.

Kaju Modak Recipe | काजू मोदक

साहित्य :
Kaju Modak Recipe in marathi
 •  अर्धा किलो ताजा खवा 
 •  पाव किलो काजू तुकडा 
 • २ वाट्या पिठी साखर 
 • १ टीस्पून वेलदोडा पूड 
 • थोड दूध ( काजू भिजवण्यापुरत )
कृती:
 1. काजू दुधात भिजत टाकून तासाभराने मिक्सर मध्ये  घ्यावे.
 2. खावा मंद आचेवर भाजून घेऊन त्यात काजूची पास्ते व पिठी साखर घालावी.
 3. एकसारखं परतून घेऊन घट्टसर गोळा तयार झाला की उतरून घ्यावे.
 4. थंड झाल्यावर वेलदोडा पूड त्यात मिसळून घ्या.
 5. नंतर साच्यात भरून छोटे छोटे मोदक बनवावेत.

Monday, September 17, 2012

Rava Modak Recipe | रव्याचे मोदक

साहित्य :
 • ३  वाटया अगदी बारीक रवा 
 • २ चमचे तूप 
 • चवीप्रमाणे मीठ  
सारणासाठी : १ नारळ खवलेला, १ वाटी साखर किंवा गूळ , वेलची पूड, २ चमचे खसखस 

कृती :
 1. मंद आचेवर खवलेला नारळ परतून घ्या मग नंतर त्यात गूळ /साखर,खसखस घालून परता. गूळ/साखर विरघळला की आच घालून त्यात वेलची पूड घालून सारण थंड करण्यास ठेवा .
 2. ४ वाटी पाणी उकळण्यास ठेवणे.त्यात तूप व मीठ घालणे. पाण्याला उकळी आल्यावर त्यात रवा घालावा.चांगल्या वाफा आणून रवा शिजवून घ्या. मग तो परातीत घेवून तुपाचा हात घेवून चांगला मळून घ्या.
 3. नंतर मोदकाच्या साच्यात घालून करावे. मोदक करण्यापूर्वी साच्याला आतून पातळ तुपाचा हात लावावा. ह्या मोदकांना उकड काढ्याची गरज नाही.
टीप :
 मोदक साचा नसेल तर रव्याची पोळी लाटून त्यात सारण भरून मोदकांप्रमाणे आकार दयावा. 

Mawa Modak Recipe | Mava modak

साहित्य:
Mava Modak Recipe in marathi
 • अर्धा किलो ताजा खवा 
 • दीड वाटी पिठीसाखर 
 • पाव चमचा पिवळा खाण्याचा रंग 
 • १ टीस्पून वेलदोडा-जायफळाची पूड 

कृती:
 1. खवा मंद आचेवर गुलाबीसर भाजावा.
 2. मग त्यात पिठीसाखर घालून घोटत रहावं .
 3. मिश्रण पातळसर झाले की त्यात रंग व वेलदोड्याची पूड घालून एकत्र करून घ्यावे.
 4. थोडा वेळाने मिश्रण आळून घट्टसर झाले की ताटात पसरून गार करून घ्यावे.
 5. नंतर या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून साच्यात घालून मोदक करून घ्यावेत.

Batatyachi Bhaaji Recipe | बटाट्याची भाजी

साहित्य: 
Potato (Batatyachi suki bhaji recipe in marathi )
 • ५-६ मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे
 • ३-४ हिरव्या मिरच्या 
 • हिंग किंचित 
 • १ टीस्पून मोहरी 
 • १  टीस्पून जीर 
 • ५-६ पाकळ्या लसून बारीक कापलेल्या 
 • १ इंच आलं किसून 
 • १ काडी कढीपत्ता 
 • मीठ चवीपुरते 
 • १/२ टीस्पून साखर
 • कोथिबिर बारीक कापलेली  
कृती :

१. प्रथम कढईत तेल गरम करून त्यात हिंग, मोहरी, जीरं टाका, जीरं तडतडू लागले की त्यात लसून, कढीपत्ता, आलं, मिरची फोडणी घाला त्यात हळद घालून लगेच बटाटे, मीठ, साखर घालून भाजीचे मिश्रण एकजीव करा.

२. नंतर झाकण ठेवून ५ मिनिटे वाफ आणून आच घालवा. नंतर सर्व्ह करताना कोथिबिरने सजवा.

Friday, September 14, 2012

Moong Bhaji Recipe | मुग भजी

 साहित्य  :
  Moong bhaji recipe in marathi
 • १ कप मुगाची डाळ 
 • १/२ कप चना डाळ 
 • २ कांदे बारीक कापलेले  
 • धणे अर्धवट कुटून 
 • १ टीस्पून जिरे
 • ३-४ हिरव्या मिरच्या
 • १  इंच आल 
 • २ टीस्पून ओवा 
 • १/२ टीस्पून हळद  
 • १ चिमुट खाणायचा सोडा
 • पाणी   
 • कोथिबीर बारीक कापलेली  
 • तेल तळणासाठी 
 • मीठ चवीनुसार 
कृती :
 1. प्रथम दोन्ही डाळी धुऊन वेगवेगळ्या ९० मिनिटे भिजत ठेवा.
 2. नंतर दोन्ही डाळी(वाटताना डाळीची पूर्ण पेस्ट करू नका अर्धवट पेस्ट करा), जिरे, मीठ, मिरच्या, आल आणि थोडच पाणी (लागले तरच) घालून मिक्सर मधून वाटून घ्या. मग त्यात हळद, धने, ओवा, सोडा, कांदा, कोथिबीर घालून एकाच बाजूने भजीच मिश्रण ढवळा.
 3. ५-१० मिनिटांनी तेलात डीप फ्राय करा. गरमागरम भजी Tomato सॉस सोबत सर्व्ह करा :-).

Sol Kadhi Recipe | सोल कढी

साहित्य :
Sol Kadhi recipe in marathi
 •  खवलेला नारळ 
 • ७-८ सुकी आमसूल 
 • १-२ हिरवी मिरची  
 • ४-५ लसून पाकळ्या 
 • कोथिंबीर सजावटीसाठी  
 • मीठ चवीनुसार
 • जीर पूड 
 • १/४ कप आंबट ताक (आवडत असल्यास)
कृती :
 1. प्रथम ५-६ आमसूल १ १/२ कप गरम पाण्यात २५-३० मिनिटे भिजत ठेवून नंतर त्याला कुस्करून ते पाणी  गाळून कोकम रस करून घ्या.
 2. नंतर २-३ आमसूल, खवलेला नारळ, मिरची, लसून आणि चवीपुरते मीठ मिक्सर मधून वाटून घ्या. मग त्या मिश्रणाला २ कप पाणी टाकून चाळणीने गाळून घ्या. पुन्हा त्यात २ कप पाणी टाकून गाळून घ्या.
 3. त्यात आता ताक आणि वरील कोकम रस टाकून ढवळा आणि थंड करणास फ्रीज मध्ये ठेवा.सर्व्ह करताना कोथिबीर टाका आणि जीर पूड भुरभुरा. (जीर पूड सर्व्ह करताना टाका, नाही तर सोल कढीचा रंग बदलेल.)
टीप :
 • सोल कढीला फोडणी देऊन गरम (जास्त गरम नाही कोमट) पण सर्व्ह करता येते. तूप/ तेलात जीरे टाकून फोडणी करा.
 • सुक्या आमसुलान ऐवजी कोकम आगळ वापरून ही सोल कढी करता येते.

Thursday, September 13, 2012

Chicken Biryani Recipe | चिकन बिर्यानी

साहित्य : (Marinade साठी साहित्य )
Chicken Biryani Recipe in marathi
 • १ किलो चिकन 
 • ३ टेबल स्पून दही 
 • २ टीस्पून (आल +लसून + ३ हिरव्या मिरच्या + पुदिना) पेस्ट  
 • १/२ टीस्पून हळद 
 • १ टीस्पून लाल तिखट 
 • १/२ टीस्पून काश्मिरी मिरची पावडर 
 • किंचित मीठ 
 (Rice) भातासाठी साहित्य :
 • ३ कप बासमती तांदूळ (Basmati Rice)
 • २ टीस्पून तूप 
 • ३-४ काळी मिरी 
 • ३-४ लवंग 
 • १- कांडी दालचिनी 
 • ३- तमालपत्र 
 • २ १/२ कप पाणी 
 • मीठ चवीपुरते  
तळण्यासाठी साहित्य :
 • ४-५ टेबलस्पून तेल 
 • ३-४ कांदे उभे चिरून 
 • ३ बटाटे बारीक कापून 
 • काजूचे तुकडे (आवडीनुसार)
फोडणीसाठी साहित्य :
 • तेल\तूप 
 • खडा मसाला (२-मोठी वेलची, १-२ कांडी दालचिनी,१ चक्रीफुल),१/२ टीस्पून गरम मसाला पावडर 
 • २-३ Tomato बारीक कापलेला, १/२ टीस्पून लाल तिखट 
 • २ कांदे बारीक कापलेले 
थरासाठी (For Layers) साहित्य :
 • एका लिंबाचा रस 
 • १/२ कप कोमट दूध + किंचित केशर (१०-१५ मिनिटे ठेवाव.दूधाला रंग येण्यासाठी)
 • १-२ टीस्पून चाट मसाला 
 • बटर/तूप (आवडीनुसार)
कृती :
 1. प्रथम चिकन धुऊन, १ तास चिकन वरील Marinade साहित्यांनी Marinade करून ठेवा . 
 2. नंतर भात अर्धवट कुकरमध्ये शिजवून घेणे(साधारण १ शिट्टी ).शिजवताना त्यात लवंग, मिरी, दालचिनी,तमालपत्र, किंचित मीठ, तूप, पाणी टाकणे. भात शिजवल्यावर ५ मिनिटांनी कुकर उघडून पसरट भांडयात पसरून भात मोकळा करा.(Fan फास्ट करून ठेवल्यास उत्तम)
 3. एका कढईत तेल तापवून कांदा, बटाटेचे तुकडे, काजूचे तुकडे वेगवेगळे फ्राय करून घ्या.टिशू पेपरवर ठेवा. 
 4. नंतर त्याच तेलाचा वापर करून (आवडत असलास) नसेल तर दुसर तेल किंवा तूप घ्या.त्यात खडा मसाला टाका. मग त्यात बारीक कापलेला कांदा टाकून परता. कांदा गुलाबी झाला कि त्यात Tomato,लाल तिखट, गरम मसाला पावडर, मीठ टाकून परता. ५ मिनिटांनी त्यात चिकन टाका. पुन्हा डावने मिश्रण ढवळा.
 5. झाकण ठेवून १० मिनिटानी त्यात पाणी टाकून १० मिनिटे ठेवा.चिकन जास्त ड्राय (Dry) नको आहे. 
 6. एका जाड बुडाच्या पातेलात (पातेले खोलगट असावे) प्रथम भाताचा थर (layer) देऊन त्यावर किंचित मीठ भुरभुरा, एक टीस्पून तूप /बटर,एक टीस्पून केशर +दूध  पण सगळ्या भातावर टाका.
 7. नंतर त्यावर चिकनचा थर (layer) देऊन त्यावर पुन्हा भाताचा थर (layer) दया(same as above)वरील प्रणाने मीठ आणि बटर /तूप,केशर +दूध टाका. 
 8. आता फ्राय कांदा,बटाटे चा थर (layer) दया त्यावर किंचित मीठ, चाट मसाला भुरभुरा.नंतर पुन्हा भातचा थर,किंचित मीठ,केशर दूध,बटर/तूप टाका. चिकनचा थर (layer) दया.
 9. शेवटी भाताचा थर (layer) त्यावर मीठ, बटर, १ टीस्पून लिंबूचा रस,केशर दुध,काजू टाका.नंतर उलटणी उलटी करून त्याच्या साह्याने उभी छिद्र  (Vertical hole) पाडा भाताला, त्या प्रत्येक छिद्रात उरलेले एक-एक टीस्पून लिंबू रस,केशर,बटर.तूप,चिकन ग्रेव्ही टाका.(ग्रेव्ही कमी असेल तर त्यात थोड पाणी टाकून एक उकळी आण आणि मग ते पाणी त्या प्रत्येक छिद्रात टाका) कारण भात अर्धवट शिजलेला असतो.
 10. पातेल्यावर झाकण ठेवून त्याचा कड्या भिजवलेल्या कणकेने बंद करा म्हणजे वाफ बाहेर जाणार नाही.मंद आचेवर २०-२५ मिनिटे भात शिजवा.
 11. कोथिबीर,फ्राय कांदा टाकून सजवा व कोशिंबीर सोबत सर्व्ह करा. उकडलेली अंड्याचे काप करून सुद्धा सजावट करता येईल.
टीप :
 • थर (layer) देताना ४ भाताचे थर आहे त्या प्रमाणे भाताचे ४ समान भाग करून घ्यावे.
 • बिर्याणी सर्व्ह करताना उलटणी पूर्णपणे उभी पातेलायच्या शेवट पर्यत न्ह्वी नाही तर थर बरोबर सर्व्ह करताना दिसणार नाही. पातेलाय्चाया एक-एक भाजूने बिर्याणी सर्व्ह करावी.
  Alu Vadi Recipe | अळू वडी

  साहित्य:
  Alu vadi recipe in marathi
  • ५ - ६ अळूची पाने 
  • २०० ग्रॅम बेसन 
  • १ वाटी चिंचेचा कोळ 
  • १ लहान वाटी गुळ 
  • १ चमचा जिरे 
  • तिखट 
  • मीठ 
  • हळद 
  • १ टेबल स्पून तेल 
  • २ वाट्या बेसन 

  कृती:
  1. अळूची पाने धुऊन घ्यावी. बेसन, १ चमचा तिखट, गुळ, चिंचेचा कोळ, चवीनुसार मीठ, हळद, जिरे यांचे मिश्रण एकत्र करून, थोड पातळ कालवून घ्या.
  2. नंतर हे मिश्रण पानाच्या उलट्या बाजूला लावावे व दोन्ही बाजूने दुमडून नंतर त्याचा रोल तयार करावा. 
  3. हा रोल चाळणीत किंवा इडलीपात्रात १५ मिनिट उकडून घ्यावे.
  4. नंतर गार झाल्यावर छोट्या छोट्या वड्या पातळ कापून घ्याव्यात.
  5. या वड्या डीप फ्राय करून सॉस बरोबर सर्व्ह कराव्या.          Wednesday, September 12, 2012

  Garam Masala Recipe | गरम मसाला

  साहित्य :
  • लवंग १०
  • दालचिनीचे ४ तुकडे 
  • मिरी १२
  • वेलदोडे ४
  • जिरे २ टीस्पून 
  • धणे २ टीस्पून 
  • जायफळ १/२
  • खसखस २ टीस्पून 
  कृती :

   वरील सगळा खडा मसाला तव्यावर सुकेच भाजून नंतर मिक्सर मधून पूड करा.

  टीप :
  हा मसाला हवा बंद डब्यात ठेवा म्हणजे खराब होणार नाही. पुलाव, नॉन व्हेज मध्ये वापरता येतो.

  Paneer Sandwich Recipe

  Paneer Sandwich Recipe in marathi
  साहित्य :
  • १०० ग्राम पनीर तुकडे Slice
  • २  ब्रेड Slice 
  • आमचूर (Dry Mango Powder) पावडर 
  • १ चिमुटभर  लाल तिखट (आवडीनुसार )
  • १ चिमुटभर काळ मीठ
  • बटर आवडीनुसार 
  कृती :
    १. प्रमथ एका  तव्यात बटर गरम करा. मग त्यात पनीरचे तुकडे, आमचूर पावडर, लाल तिखट, काळ मीठ टाका. झाकण ठेवून एक वाफ आणा.
   २. नंतर हे मिश्रण दोन ब्रेडच्यामध्ये भरा आणि टोस्ट करा.
   ३. तयार आहे झटपट पनीर Sandwich. Tomato सॉस सोबत सर्व्ह करा.

  Sheera Recipe | Cracked Wheat sheera

  साहित्य :
  • गव्हाची लापशी (गव्हाचा लापशी रवा) पाऊण कप 
  • साखर १/२ कप + गुळ १/२ कप (आवडीनुसार)
  • मीठ किंचित  
  • तूप ३ टीस्पून 
  • पाणी ३ कप  
  • वेलची पूड १ टीस्पून 
  • मनुके १  टेबलस्पून 
  • काजू १ टेबलस्पून- कापून बारीक केलेले 
  कृती :

   १. प्रथम नॉन स्टिक तव्यात लापशी भाजून घ्या (जसा शिऱ्यासाठी रवा भाजतो तसा). साधारण १० मिनिटे मंद आचेवर भाजा.
  २. नंतर कुकरमध्ये भाजलेला रवा टाकून त्यात २ टीस्पून तूप,पाणी, मीठ घाला आणि २ शिट्या काढा.
  ३. शिट्या झाल्यावर ५-१० मिनिटांनी कुकर उघडून त्यात वेलची पूड, साखर, गूळ किसून (बारीक तुकडे करून) टाका.लगेच मिश्रण गरम असताना ढवळा म्हणजे गूळ, साखर लगेच विरळघलेल आणि पुन्हा कुकर लावा आणि शिटी न लावता एक वाफ आणा.
  ४. सर्व्ह करताना काजू, मनुके टाका.

  Tuesday, September 11, 2012

  Soya Bean Dahi vada Recipe | सोयाबिनचे दहीवडे

  साहित्य :
  • सोयाबिनच्या वड्या (गोळे) मुठभर 
  • दही एक कप 
  • मीठ चवीनुसार 
  • १ १/२ टेबलस्पून साखर (आवडीनुसार)
  • जीरे पावडर चिमुटभर 
  • तिखट चिमुटभर 

  कृती :
   १. प्रथम सोयाबीनचे गोळे गरम पाण्यात टाकावेत.जरा वेळाने चाळणीवर काढावे. थंड पाण्यात टाकून दाबून   घ्यावेत.
  २.  एका बाउल मध्ये दही, मीठ, साखर चांगले मिक्स करावे (रवीने केल तरी चालेले किंवा Grinder).
  ३. सर्व्हिग बाउल मध्ये सोयाबीनचे गोळे घ्यावेत त्यावर दहीचे मिश्रण टाकावे आणि त्यावर जिरे पावडर,तिखट भुरभुरावी.

  टीप :
     लगेच सर्व्ह करू नये, सोयाबीन थोड्या वेळ दह्यात बुडवून ठेवल्यास जास्त चांगले लागतील.

  Egg Curry with milk Recipe

  साहित्य :
  • २ उकडलेली अंडी (कवच काढून)
  • २ उकडलेली बटाटे (साली काढून)
  • २ कांदायची पेस्ट 
  • २ टीस्पून आल-लसून पेस्ट 
  • २ Tomato पेस्ट  
  • १/४ टीस्पून साखर (आवडत असल्यास )
  • १/२ टीस्पून जीर 
  • १/४ कप दुध 
  • १/४ टीस्पून काश्मिरी मिरची पावडर 
  • १/४ टीस्पून हळद 
  • १ १/२ टीस्पून धणे- जिरे पूड 
  • ६ काजू 
  • १/२ टीस्पून गरम मसाला पावडर 
  • १/२ टीस्पून किचन किंग मसाला 
  • १ १/२ टीस्पून खसखस (Poppy Seeds)
  • २ टीस्पून तूप 
  • १ पेजपण (Bay Leaf)
  • २ लवंग (Clove)
  • १/२ कांडी दालचिनी (Cinnamon Stick)
  • मीठ चवीनुसार 
  कृती :

  १. काजू गरम पाण्यात थोडया वेळ भिजवत ठेवा. नंतर काजू आणि खसखसची पेस्ट करून घ्या.
  २. एका कढईत तेल तापत ठेवा. त्यात पेजपान, लवंग, दालचिनी  आणि जीर टाका.
  ३. जीर तडतडलायस लागल्यावर त्यात आल-लसून पेस्ट, कांद्याची पेस्ट टाका. कांदा तेलात गुलाबी होई पर्यत परता.
  ४. नंतर त्यात Tomato पेस्ट, हळद, धन-जीरपूड, काश्मिरी मिरची पावडर, किचन किंग मसाला,साखर टाका.झाकण ठेवून एक वाफ आणा.
  ५. मिश्रणाला तेल सुटले कि त्यात काजू-खसखस पेस्ट, मीठ, गरम मसाला, दुध टाका.
  ६. २ मिनिटांनी त्यात अंडी(अंड्यांना मध्ये काप दया), बटाटे घाला आणि आवश्यक असल्यास पाणी घाला. उकळी आल्यावर आच घालवा.
  ७. आता त्यावर तूप सोडा आणि कोथिबीरने सजवा.
  ८. चपाती/रोटी/भाता सोबत सर्व्ह करा.


  Monday, September 10, 2012

  Pav Bhaji Recipe | पाव भाजी

   साहित्य :
  • १ छोटा फ्लॉवर कापलेले (३-कप)
  • ३ मध्यम बटाटे 
  • १/२ कप फरसबी बारीक कापलेली 
  • २ भोपळी मिरची बारीक कापलेली 
  • २ मध्यम आकाराचे कांदे 
  • २ टेबल स्पून तेल 
  • १ टीस्पून आलं-लसून पेस्ट 
  • १ टीस्पून काश्मिरी मिरची पावडर (Everest )
  • १ टेबल स्पून Everest पाव भाजी मसाला 
  • १ टीस्पून लाल तिखट 
  • २-३ लाल मोठे Tomato 
  • मीठ चवीनुसार 
  • १ टेबल स्पून बटर 
  • १/२ कप मटार
  • कोथिबीर बारीक कापलेली सजवण्यासाठी 
  • १ कांदा बारीक कापलेला 
  • एक लिबू (कापलेला)
  कृती :

   १.  प्रथम फ्लॉवर, बटाटे, भोपळी मिरची, मटार, फरसबी कुकर मध्ये शिजवून घ्या.(साधारण ४ शिट्ट्या)
   २ . नंतर कांदा आणि Tomato मिक्सर मध्ये वाटून घ्या.
   ३ . एका कढईत तेल तापत ठेवा. त्यात आलं-लसून पेस्ट, कांदा - Tomato पेस्ट टाका. त्यावर झाकण ठेवून १०-१५ मिनिटे मंद आचेवर ठेवा. पाणी सुटल्यावर त्यात मीठ, लाल तिखट, काश्मिरी मिरची पावडर टाकून मिश्रण एकजीव करून ५ मिनिटे ठेवा.
  ४. कुकर मधल्या वाफलेल्या भाज्या, पाव भाजी मसाला टाकून नीट म्याश (Mash) करा. आता हे मिश्रण कढईत टाकून एकजीव करा.
  ५. त्यात बटर घाला. ५ मिनिटांनी आच घालवा.सर्व्ह करताना कोथिबीर,कांदा आणि बटर टाका.
  ६.एका तव्यावर पावचे दोन भाग करून बटर लावून गरम करा आणि भाजी सोबत सर्व्ह करा.
  Sunday, September 9, 2012

  Biscuit Pudding Recipe

  साहित्य :
  • मारी बिस्कीटे (Marie Biscuits) - १६
  • दुध १/२ लिटर 
  • साखर- ५ टेबलस्पून  
  • कोको पावडर- ३ टेबलस्पून 
  • क्रॉनफ्लॉवर - ३ टेबलस्पून 
  • Instant Coffee Powder - १ टिस्पून मिक्स with ५-६ टेबलस्पून इन Hot Water 
  • सजावटीसाठी- चॉकलेट चिप्स,चॉकलेट Curls, Nuts (काजू-बदामचे तुकडे )
  कृती :

  १. प्रथम मारी बिस्कीटे दोन्ही बाजूंनी Instant Coffee मिश्रणात डीप करा आणि मग एका चौकोनी बाउल मध्ये ठेवा.
  २. नंतर एका बाउल मध्ये कोको पावडर, कोर्नफ्लावर आणि थंड दुध १/४ कप, नीट एकत्र करा.( गूठळ्या होऊ देऊ नका)
  ३. एका पातेल्यात/Pan मध्ये दुध गरम करायला ठेवा त्यात साखर घाला. उकळी आली की त्यात वरील (कोको पावडर + कॉर्नफ्लावर ) मिश्रण टाकून नीट ढवळा.सतत ढवळत राहा.
  ४. मिश्रण घट्ट होत आल की आच घालवा आणि ते मिश्रण गरम असतना मारी बिस्किटावर टाका. हा सॉस सगळ्या बिस्किटावर पसरेल असा टाकावा.
  ५. आता Nuts/ काजू-बदाम, चॉकलेट चिप्स,Curls ने सजवा.
  ६. थंड करण्यास ५-६ तास फ्रीज मध्ये ठेवा. थंड सर्व्ह करा. Yummy :-)

  Banana Thalipeeth Recipe | Kelyache Thalipeeth

  साहित्य:
  • २ मोठी कच्ची केळी  
  • भाजलेल्या शेंगदाण्याचा अर्धी वाटी कूट 
  • अर्धा चमचा लाल तिखट किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा 
  • १ चमचा जिरेपूड 
  • चवीपुरते मीठ 
  • थोडेस तूप 

  कृती:
  1.  साले काढून केळी किसावीत, त्यात दाण्याचा कूट, तिखट, जिरेपूड, मीठ घालून कालवावे.
  2. प्लास्टिकच्या कागदावर लहान लहान थालीपीठे थापावीत.
  3. तव्यावर थोडे तूप घालून दोन्ही बाजूंनी थालीपीठे भाजावी. 

  पौष्टीक पचडी (For Weight Loss)

  साहित्य :
  • उकडलेला मका १ वाटी 
  • मोड आलेले मूग १ वाटी 
  • मटारचे दाणे १ वाटी 
  • चिंच गुळाची चटणी १ १/२ टीस्पून 
  • पुदिना,मिरची,कोथिबीर पेस्ट 
  • किसलेले आल 
  • किसलेले गाजर   
  • कापलेली कोथबिर 
  • चवीनुसार मीठ 

  कृती:

  १.मका, मोडाचे मूग, मटार वाफवून गार करून त्यांना एकत्र करणे.
  २.त्यात दोन्ही चटणी, किसलेले गाजर, आल व मीठ घालून सर्व एकत्र करणे.वरून चिरलेली कोथिबीर टाकावी.

  टीप :
  मोडाची धान्ये व गाजर ह्यामुळे प्रोटीन्स मिळतात. वजन कमी करण्याकरता पचडी उपयुक्त आहे.

  वाळवणाच्या मिरच्या (Valvanachya Mirchaya Recipe)

  साहित्य :
  •  जाड लांबट हिरव्या मिरच्या १/४ किलो 
  •  दही १ वाटी 
  • १/२ टीस्पून हिंग 
  • २ टीस्पून मेथीच्या दाण्याची पूड 
  • २ टीस्पून मीठ 
  कृती :

  १. मिरच्याना उभी चीर ध्यावी.
  २. एका बाउलमध्ये दही फेटून त्यात हिंग, मेथी पूड, मीठ एकत्र करून मिरच्यात भरावे.
  3. ४-५ दिवस उन्हात वाळवावी. वर्षभर छान राहतात. तळून खिचडीबरोबर खावी.(आजारपणा नंतर तोंडाची चव जाते त्यावेळी ध्यावी.) 


  Amla Chatney Recipe | आवळ्याची चटणी

  साहित्य :
  •  ६ आवळे 
  • १ टीस्पून जिरे 
  • १/२ खवलेला नारळ 
  • १/४ वाटी कच्चे शेगदाणे 
  • ५ हिरव्या मिरच्या 
  • १ तुकडा आले 
  • थोडी कोथिबीर 
  • चवीला मीठ व गूळ 
  कृती :

      १. आवळे किसून घ्यावे व बाकी सर्व पदार्थ एकत्र करून चटणी करावी.

  टीप : आवळा खाल्ला जातो व बरेच दिवस टिकते .

  लाल भोपळयाच्या सालीची चटणी (Lal Bhoplaychaya Salichi Chatney Recipe)

  साहित्य :
  • लाल भोपळयाच्या अगदी बारीक कापलेल्या साली १/२ वाटी 
  • १/४ वाटी तीळ 
  • सुक्या खोबऱ्याचा कीस किवां ओल्या नारळचा चव १/२ वाटी 
  • ३-४ लाल सुक्या मिरच्या 
  • गूळाचा लहान खडा 
  • लिबू एवडा चिचेचा कोळ 
  • चवीपुरते मीठ 
  • फोडणीसाठी तेल २ टीस्पून 
  • अंदाजे मोहरी, हिंग,हळद 
  कृती :

   १. तीळ व खोबऱ्याचा कीस मंद आचेवर कढईत भाजून घ्यावा.नंतर त्यात लाल मिरच्या टाकून भाजाव्या.
   २. मग त्यात सालीही परतून घ्यावा.हे सगळे भाजलेले पदार्थ, चिंचेचा कोळ, गूळ, मीठ घालून मिक्सरला लावा. अगदी थोडे पाणी घाला.
  ३. तेलात हिंग, मोहरी, हळद याची फोडणी घाला.अशा चटणीमुळे जेवणात चव येते.  

  सहा रसांची चटणी (6 Rasanchi Chatney Recipe)

  साहित्य :
  • १ कैरी किसून 
  • १/२ नारळ खवून 
  • कडीलिबाची १० पाने धुऊन 
  • १/४ वाटी शेगदाणे 
  • थोडा गूळ 
  • १ टीस्पून लाल तिखट (आवडीनुसार)
  • मीठ चवीनुसार 
  • १ टीस्पून जीर 
  कृती :

  १. कैरी कीस, नारळ, पाने, दाणे, गूळ, मीठ, तिखट, जिरे एकत्र वाटून चटणी करा. 

  लसूणाची चटणी (Lasnachi Chatney Recipe)

  साहित्य :
  • लसूण २ गड्डे 
  • मिरी  १ टीस्पून 
  • सुके खोबरे १/४ वाटी 
  • शेगदाणे थोडेसे (भाजलेले)
  • भाजकी चणाडाळ १ टीस्पून 
  • मीठ व साखर चवीनुसार 
  कृती :

  १. खोबरे भाजून घ्यावे व वरील सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमधून काढावे.

  टीप :
   चटणीत एक बुटूक टाकावे.मिरी ऐवजी तिखट चालते पण मिरी पाचक असते व स्थुलता कमी करण्यास मदत करते.

  Saturday, September 8, 2012

  Dhirde Recipe | Cucumber Dhirde

  साहित्य:
  • १ वाटी काकडीचा किस 
  • १ वाटी तांदळाचे पीठ 
  • १ वाटी कणिक (गरजे प्रमाणे कमी जास्त )
  • हिरवी मिरची 
  • आलं लसून पेस्ट 
  • मीठ चवीनुसार 
  • जीरेपुड 
  • तेल  
  • चिमुटभर खाण्याचा सोडा 
    कृती:
  1. काकडी किसून घ्यावी ( शक्यतो कोवळ्या काकडीचा वापर करावा )
  2.  त्यात हिरवी मिरची, आलं लसून पेस्ट, जिरेपूड, मीठ, घालावे. त्याला पाणी सुटतेच.
  3.  त्यात तांदळाचे पीठ, कणिक व गरजे प्रमाणे पाणी घालून पातळसर कालवावे.
  4.  चिमुटभर खाण्याचा सोडा घालावा व नेहमी प्रमाणे तव्यावर तेल सोडून धिरडी बनवावीत.
  5.  दोन्ही बाजूने भाजावेत.      
  6.  खोबऱ्याची चटणी किंवा tomato सॉस बरोबर serve करावे.

  टीप:
      काकडी ऐवजी मुळा, गाजर वा दुधी भोपळा किसून घालूनही धिरडी बनवता येतील. 

  Bread Milk Vadi Recipe |

  साहित्य :
  • ५ ब्रेड (कडा काढून मिक्सर बारीक  केलेले तुकडे ) (Brown Bread)
  • १/४ कप खवलेला नाळर 
  • १/४ कप साखर 
  • २ कप दुध 
  • १/४ खवा 
  • १/४ तूप 
  • सजावटीसाठी कापलेले बदाम-काजूचे तुकडे 
  कृती :

  १. एका नॉन स्टिक कढईत तूप गरम करून त्यात खवलेला नाळर, खवा, साखर, दुध घालून stir करत राहा.
  २. ५ मिनिटांनी ब्रेड टाकून stir करत राहा जो पर्यत ते घट्ट होत नाही.
  ३. घट्ट झालेले मिश्रण एका ताटात तूप लावून त्यावर थंड करण्यास ठेवा व लगेच त्याच्या चोकनी वड्या पाडा. त्यावर बदाम-काजूच्या तुकड्याने सजावट करा.
  ४. थोड थंड झाल कि फ्रीज मध्ये ठेवा. आणि थंड सर्व्ह करा.


  Friday, September 7, 2012

  Prawn Patties Recipe | कोलंबीचे Patties

  साहित्य :
  •  २ वाटी कोलंबी / करंदी (छोटी कोलंबी )     
  • २ कांदे बारीक कापलेले 
  • २ टीस्पून आल-लसून पेस्ट
  • १/२ टीस्पून हळद 
  • १ टीस्पून लाल मिरची पावडर 
  • मीठ चवीनुसार 
  • तेल 
  • १ टीस्पून लिबू रस 
  • कोथिबीर कापून घेतलेली 
  • (कव्हरसाठी) : ५-६ बटाटे उकडून लगदा करून 
  • १/२ वाटी बेसन व मीठ चवीनुसार 
  कृती :

  १.प्रथम तेलावर कांदे परतून घेवून त्यावर आल-लसून पेस्ट, हळद, मिरची पावडर घालून परतणे.
  २. त्यावर कोलंबी व मीठ घालून कोरडेच शिजवावे.लिबु रस घालावा.कोथिबीर घालून सारण थंड कराव.
  ३. कव्हरसाठी दिलेले साहित्य एकत्र करून नीट मळावे.बटाट्याच्या चिगटपणानुसार बेसनचे प्रमाण कमी-जास्त करावे.या मिश्रणाचा लिबूएवडा गोळा करून त्याला वाटीसारखा आकार देऊन त्यात वरील कोलंबीचे सारण भरून बंद करून चपटा आकार घ्यावा. असे सगळे patice करून घ्यावेत.
  ४. आता नॉनस्टिक तव्यावर तेल सोडून त्यात हे patice shallow फ्राय करावेत.
  ५. सॉस सोबत सर्व्ह करा.

  टिप :   जर बेसन आवडत नसेल तर ब्रेड क्रब्स घेवू शकतात. 

  Vari Tandul Pulav Recipe | वरी तांदळाचा पुलाव

  साहित्य:
   
  • १ वाटी तांदूळ 
  • एक रताळे 
  • एक बटाटा 
  • मूठभर शेंगदाणा 
  • १०-१२ काजू 
  • ५-६ लवंग
  • १ चमचा जिरं 
  • २-३ हिरव्या मिरच्या 
  • १ मोठा चमचा दही 
  • १ मोठा चमचा तूप 
  • चवीनुसार मीठ 
  कृती:
    १.वरी तांदूळ धुऊन घ्यावेत. रताळे व बटाट्याचे चौकोनी तुकडे करून घ्या. शेंगदाणे ५-६ तास भिजून ठेवावेत.
    २.तूप तापवून त्यात लवंगा आणि जिरे घालावे.जिरे तडतडले की त्यात मिरच्यांचे तुकडे घालावेत. मग त्यात भिजलेले शेंगदाणे, काजू , रताळे, वरी तांदूळ, दही व कापलेले बटाटे घालून परतून घ्या.
  ३.मग त्यात २ वाट्या उकळते पाणी व चवी पूरते मीठ घालून पुलाव शिजू द्यावे.

     

  Mugache Dhirde Recipe | मुगाचे धिरडे

  साहित्य:
  • १ वाटी मूग 
  • १ कांदा 
  • २-३ हिरव्या मिरच्या 
  • कोथिंबीर 
  • जिरं 
  • मीठ 
  • तेल 
  कृती:

      १.मुग २ तास भिजत घालावे. नंतर मिरच्या, जीरे व मुग एकत्र करून मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यावे.
      हे वाटलेले मिश्रण मीठ व पाणी घालून सरसरीत करून घ्यावे. कांदा व कोथिंबीर बारीक चिरून ठेवावी.
      २.तापलेल्या  तव्यावर थोडे तेल घालून मुगाचे धिरडे पसरून घ्यावे आणि ते तव्यावर असतानाच त्यावर        बारीक चिरलेला कांदा व कोथिंबीर घालावी.
      ३.धिरडे तयार झाल्यावर गरमागरम वाढावे.
  टीप:
     मुग वाटून झाल्यावर लगेच धिरडी बनवावीत, म्हणजे हिरवा रंग छान राहतो. 

  Chicken Popcorn Recipe | चिकन पॉपकॉर्न

  साहित्य :

  • १/२ किलो बोनलेस बारीक कापलेले चिकन    
  • २-३ टीस्पून तंदुरी मसाला 
  • १/४ टीस्पून लाल रंग (आवडत असल्यास )
  •  १ १/२ वाटी दही (फेटलेले)
  • धणे -जीर पूड आवडीनुसार 
  • मीठ चवीप्रमाणे 
  • लाल तिखट आवडीनुसार 
  • हिरवी मिरची + कोथिबीर पेस्ट (आवडीनुसार)
  • १ टीस्पून आलं -लसून पेस्ट 
  • १ लिबचा रस 
  • १/२ टीस्पून हळद 
  • तळण्यासाठी तेल 
  कृती:

  १. प्रथम चिकनला मीठ, लिबू रस लावून २०-२५ मिनिटे ठेवा.
  २. नंतर दही, लाल रंग, तंदुरी मसाला, आल-लसून पेस्ट, मिरची-कोथिबीर पेस्ट, हळद, धणे-जिरे पूड,लाल तिखट लावून १/२ तास ठेवणे.
  ३. नंतर डीप फ्राय करुन टीशू पेपर वर ठेवा. तयार आहे चिकन पॉपकॉर्न !!

  खजुराचे गुलाबजाम (Khajurache Gulabjam Recipe)

  साहित्य :
  • खजुराची पेस्ट १ वाटी 
  • दुध १/२ वाटी (लागलास घेवू शकता)
  • मैदा १/२ वाटी
  • खवा  १/२ वाटी 
  • १-२ चमचे तूप 
  • साखर १ वाटी 
  • पाणी सव्वा वाटी 
  • वेलची पूड 
  • तळण्यासाठी तेल/तूप 
  • थोडे काजूचे तुकडे (आवडत असल्यास)
  • सजावटीसाठी चांदीचा वर्ख  
  कृती :
  १ . खजुर बिया काढून त्याचे तुकडे करून  ३-४ तास गरम(एकदम पण गरम नको ) दुधात भिजवून ठेवणे. नंतर वाटून घेणे.
  २ .नंतर त्यात मैदा, खवा घालावा. सगळ मिश्रण एकजीव कराव.(खवा किसणीवर किसून घेणे)
  ३ .तुपाचा हात घेवून मिश्रणाचे गुलाबजामुन प्रमाणे गोलाकार गोळे करावे आणि गोळे करत असताना त्यात काजूचा छोटा तुकडा टाकावा.
  ४. गोळे मंद आचेवर तुपात/तेलात डीप फ्राय करावे.
  ५. एका पातेलात तळण्याआधी साखर पाण्यात टाकून एकतारी पाक करावा. झाला कि त्यात वेलची पूड टाकावी.
  ६. तळून झालेले गोळे पाकात टाकावे.
  ७. चांदीच्या वर्खने सजवावे.

  Thursday, September 6, 2012

  Rasgulla With Ice-Cream Recipe

  साहित्य :
  • Vanilla Ice-Cream १ कप 
  • २ रसगुल्ले 
  • ३-४ चमचे रुअफझा (Rooh Afza)
  • लाल गुलाबाच्या पाकळ्या सजावटी साठी 
  कृती :

  एका सर्विग बाऊलमध्ये २ रसगुल्ले घ्या(रस्गुल्ल्यातल पाणी दाबून काढून टाका.).त्यात Vanilla Ice cream टाका.नंतर त्यावर २-३ चमचे रुअफझा टाका. आणि मग लाल गुलाबाच्या पाकळीने सजावट  करा.

  टिप :
    रुअफझा ऐवजी स्ट्रोबेरी /ऑरेग/मांगो जेली ने सजवू शकतो. आणि मग त्या नुसार स्ट्रोबेरी / संत्री /   आंब्याच्या फोडीने सजवू शकतो.

  Apple Halwa | सफरचंदचा हलवा

  साहित्य :

  • १ १/२ टीस्पून तूप 
  • २ १/२ कप किसलेले सफरचंद  
  • १/४ कप मावा 
  • ३/४ कप दुध 
  • ३ १/२ टीस्पून साखर 
  • १/४ कप कापलेले अक्रोड,काजू,बदाम तुकडे 
  • Vanilla Essence २-३ थेंब 

  कृती :

  १  . नॉन-स्टिक कढई मध्ये तूप गरम करा मग त्यात सफरचंद घाला. मंद आचेवर ५-७ मिनिटे सारखे हलवत राहा.

  २ . आता मावा टाका आणि २-३ मिनिटे हलवा.

  ३ . नंतर दुध टाकून ७-८ मिनिटे हलवा .

  ४ . आता साखर आणि कापलेले Dry फ्रुट तुकडे टाका. मंद आचेवर ७-८ मिनिटे हलवत राहा जोपर्यत त्यातील पाणी कमी होत नाही. 

  ५ . पाणी आटलं की आच घालावा आणि त्यात आता Vanilla Essence घाला.(Vanilla Essence नसलातर वेलची पूड घाला)

  टीप : सफरचंद कापले असता ते काळे होते तर एक-एक करून किसा आणि ते मिठाच्या पाण्यात ठेवले असता काळ होत नाही(कीस करण्यापूर्वी).   Fish Cutlet Recipe | फिश वडा

  साहित्य :
  • खवले व काटे काढून साफ केलेली -उकडलेली मासळी (आवडते मासे पोप्लेट/सुरमई)-२२५ ग्राम 
  • उकडून मऊ केलेले बटाटे -१२५ ग्राम 
  • ब्रेड क्र्ब्ज -लागतील तसे 
  • तेल तळन्यासाठी 
  • मीठ चवीनुसार 
  • एक अंडे फेटून (आवडत असल्यास )
  • किसलेला कांदा - १ १/२ टीस्पून (१ कांदा मध्यम आकाराचा )
  • वाटलेली हिरवी मिरची चवीनुसार 
  • आल-लसून पेस्ट चवीनुसार 
  • कोथिबीर चिरून बारीक केलेली 
  कृती :

    मासळी, बटाटे, मीठ, मिरची वाटण, कांदा, आल -लसून पेस्ट, कोथिबीर एकत्र करा .
    त्यात अंड घाला. एकजीव करा. पाणी वापरू नका . 
    मिश्रणाचे वडया-प्रमाणे गोळे करा नी ब्रेड क्र्ब्ज मध्ये घोळुन .
    नंतर गरम तेलात, दोन्ही बाजूंनी लालसर होईपर्यत तळा.आणि सॉस सोबत गरमागरम खा .

  टिप :  जर डीप फ्राय आवडत नसेल तर रवा लावून Shallow Fry करा .

  Mix Green Vegetables Cutlet Recipe | मिक्स पालेभाजी वडी

  Kothimbir Vadi recipe in marathiसाहित्य:
  • अर्धी जूडी शेपू 
  • अर्धी जूडी मेथी 
  • अर्धी जुडी कोथिंबीर 
  • बेसन १०० ग्रॅम 
  • १ टेबलस्पून तांदळाचे पीठ 
  • ४ टेबलस्पून सफेद तीळ 
  • जिरे १ स्पून 
  • तिखट 
  • मीठ चवीनुसार 
  • आले
  • लसूण पेस्ट १ टेबलस्पून 
  • अर्धी वाटी तेल 
  कृती :

       शेपू, मेथी आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्या.सफेद तीळ भाजून, जाडसर वाटून घ्यावे. नंतर त्यात बेसन, तांदळाचे पीठ, आलं लसणाची पेस्ट टाकून त्याचे मिश्रण करून घ्यावे. या मिश्रणात तेल, जिरं, तिखट, हळद,
  आणि मीठ चवी नुसार घालून सर्व मिश्रण एकत्र करून घट्ट मळून घ्यावे.

      या मिश्रणाचा लांबसर गोळा करून ते उकडून घ्या. उकडून झाल्यानंतर ते थंड होऊ द्या.
      थंड झाल्यावर ते वडीच्या च्या आकाराचे कापून डीप फ्राय करा.

  Suran Fry Recipe-सुरण फ्राय

  साहित्य :
  • सुरणाचे कंद २५० ग्राम 
  • मीठ 
  • तेल 
  • तिखट चवीप्रमाणे 
  • चाट मसाला चवीप्रमाणे 
  कृती :
  1.   सुरण  धुऊन घ्या. साले काढा. 
  2.  जाडसर कीस पडेल असा कीस करा . तेल तापवा, 
  3. त्यात हा कीस टाकून खरपूस व कुरकुरीत तळा काढून पेपर ठेवा. तेल टिपले गेले की त्याला मीठ, तिखट आणि चाट मसाला लावा .

  Wednesday, September 5, 2012

  स्टफ्ड अंडी (Stuffed Egg Recipe)

  साहित्य :
  • उकडलेली अंडी - ३
  • चीझचा कीस - १ वाटी 
  • चवीनुसार तिखट+मीठ+मोहरी पूड याचे मिश्रण 
  • Tomato सॉस - अर्धी वाटी 
  • बटाटा सळी किवां कुरकुरे वाटीभर 
  कृती :

  अंडी सोलून मधोमध चिरा. अलगत पणे आतील पिवळा भाग काढा. एका बाऊल मध्ये मीठ, मसाले, चीज, सॉस घालून एकत्र करा. डेकोरेटींग पिशवी  ( Decorating Bag ) मध्ये ते मिश्रण  भरा आणि पांढऱ्या भागाच्या   पोखळीत, केक मध्ये जसा क्रीम भरतात तस भरा आणि बटाटा सळी / कुरकुरे ने सजवा. 

  टिप : डेकोरेटींग पिशवी नसेल तर प्लास्टिक च्या पिशवीच्या भेळ च्या पेपर प्रमाणे रोल करून स्टफ करू शकता . 


  Green Chicken Masala Curry Recipe | हिरव्या मसाल्याच चिकन


  साहित्य :
  • चिकन - वीथ बोन - अर्धा किलो 
  Chicken in Green Gravy Recipe
  मसालायचं साहित्य : 
  •  धणे - २ टीस्पून 
  •  जिरे - १ टीस्पून 
  • काळी मिरी - १ टीस्पून 
  • तेजपान - १
  • दालचिनी - १ तुकडा 
  • हिरवी वेलची - ४-५
  • स्टार फुल (चक्री फुल )-१
  • तीळ - २ टीस्पून 
  • खसखस - ३ टीस्पून 
  • सुके खोबरे किसलेले - ४-५ टीस्पून 
  • लवंग - ४-५
  • हिरवी मिरची - ५-६
  • कोथिबीर - १ जुडी 
  इतर साहित्य
  • तेल - ४-५ टेबल स्पून 
  • बारीक चिरलेला कांदा - २ मोठे कांदे 
  • आलं-लसून पेस्ट - ३-४ टीस्पून 
  • हळद - १ टीस्पून 
  • मीठ -२-३ टीस्पून
  कृती :
  1. चिकन नीट धुवून त्याला मीठ, हळद, आलं-लसून पेस्ट, लावून ठेवून घ्या . साधारणपणे १ तास तरी असच ठेवा .
  2. मंद आचेवर मसाल्यासाठी दिलेलं साहित्य भाजून घ्या. भाजून झाल्यावर सगळ्यात शेवटी हिरवी व कोथबीर टाका व आच घालवून थंड झाला कि पाणी टाकून  वाटून घ्या.कढईत तेल गरम करून त्यात कांदा लाल होईपर्यत परतून घ्या. आता त्यात चिकन टाकून छान परतून घ्या.
  3. थोडं गरम पाणी टाकून मंद आचेवर चिकन  १०-१५ मिनिटे शिजवून घ्या . मग त्यात वाटलेला हिरवा मसाला टाका . आवश्यक असल्यास पाणी टाका व चिकन नीट शिजवून घ्या आणि गरमागरम भाकरीबरोबर सर्व्ह करा .
  टीप : वाटलेला हिरवा मसाला शक्यतो शेवटी टाका, म्हणजे जास्त काळा होणार नाही. खोबर किसायाच्या   आधी वरचा काळा भाग काढून घ्या, म्हणजे आपला मसाला जास्त काळा होणार नाही . 


  Paneer Hara Bhara Kabab Recipe

  साहित्य :
  • पाव किलो किसलेले पनीर 
  • २ उकडलेले बटाटे 
  • १ वाटी वाफालेले मटार 
  • ४-५ पालकाची पाने 
  • कोथंबीर
  • धने -जीर पूड  
  • मीर पूड
  • आल-मिरची पेस्ट
  • मीठ चवीनुसार 
  •  तेल 
  • २ चमचे  कॉर्नफ्लोर 
   कृती :

   प्रथम पालकाची पाने गरम पाण्यात टाकून ठेवावीत नंतर मिक्सर मध्ये पेस्ट करून घ्यावी.

  नंतर एका बाऊलमध्ये किसलेले पनीर, कुस्करलेले बटाटे, मटार, पालकाची पेस्ट, कोथंबीर , कॉर्न फ्लॉवर ,
  चवी नुसार आल-मिरची पेस्ट, मीठ, धने -जिरे पूड, मीर पूड सर्व एकत्र करून घ्यावे.

  या मिश्रणाचे गोलाकार कबाब करावेत . त्यावर एक बाजू बदाम/काजू दाबून लावावा.आता ते कबाब डीप फ्राय करावे अथवा कमी तेलात (Shallow Fry) परतावे  आणि Tomato सॉस बरोबर सर्व्ह करावे .

  Tuesday, September 4, 2012

  Bhendi Recipe | ताकातील भेंडी

  साहित्य :
  • कापलेली  पाव किलो भेंडी 
  •  ४ चमचे दही + १ चमचा बेसन + ४ चमचे पाणी (रवीने ढवळून घेणे)
  •  १-२ चमचा आल-लसून-हिरवी मिरची-जीर पेस्ट
  •  चवीनुसार मीठ 
  •  १/२ चमचा  मोहरी
  •  १/४ चमचा हिंग 
  •  कढीपत्ता 
  •  तेल फोडणी साठी 
  •  सजावटी साठी कोथबीर 

  कृती :

  1.  प्रथम तेल तापवावे त्यात मोहरी,हिंग, कढीपत्ता ची फोडणी ध्यावी.
  2. मग त्यात पेस्ट टाकून परतावी.
  3. नंतर त्यात भेंडी टाकावी आणि मग नंतर ताक (वरील मिश्रण दहीच ) आणि मीठ टाकून झाकण ठेवून एक वाफ काढावी.
  4.  कोथबीर टाकून सजावट करावी.


  Mawa Cake Recipe | मावा केक

   साहित्य:
  •      १ कप मैदा,
  •      १ कप साखर, 
  •      १/२ कप तूप,
  •      २ अंडी,
  •      १/२ कप मावा,
  •      १/२ कप  दुध,
  •      १/२ टी स्पून बेकिंग पावडर,
  •      वेनिला ईसेन्स।

   कृती:

     मैदा आणि बेकिंग पावडर ४-५ वेळा चाळून घ्या, मावा  १/२ कप दुधात भिजत ठेवा।
     पसरट भांड्यात पहिल्यांदा तूप फेसा। नंतर त्यात साखर घालून चांगले फेसून घ्या।
    (मिश्रण क्रीम प्रमाणे मऊ झाले  पाहिजे)
    एका भांड्यात अंडी फेसून घ्या। तूप साखरेच्या मिश्रणात थोडे थोडे अंडे घालून फेसून घ्या।
    नंतर त्यात मावा दुधाचे  मिश्रण आणि वेनिला इसेंस घाला।

    थोडा थोडा मैदा कट फोल्ड पद्धतीने मिसळा( कट फोल्ड पद्धत म्हणजे  मिश्रण कापून दुमडल्या 
   प्रमाणे मैदा मिसळा )
       
   नंतर, टीनच्या कपांना तूप मैदा लावून त्यात मिश्रण घालून १५ मिनटे बेक करा।
   तयार आहे तुमचा मावा केक। :)