साहित्य :
- लाल भोपळयाच्या अगदी बारीक कापलेल्या साली १/२ वाटी
- १/४ वाटी तीळ
- सुक्या खोबऱ्याचा कीस किवां ओल्या नारळचा चव १/२ वाटी
- ३-४ लाल सुक्या मिरच्या
- गूळाचा लहान खडा
- लिबू एवडा चिचेचा कोळ
- चवीपुरते मीठ
- फोडणीसाठी तेल २ टीस्पून
- अंदाजे मोहरी, हिंग,हळद
कृती :
१. तीळ व खोबऱ्याचा कीस मंद आचेवर कढईत भाजून घ्यावा.नंतर त्यात लाल मिरच्या टाकून भाजाव्या.
२. मग त्यात सालीही परतून घ्यावा.हे सगळे भाजलेले पदार्थ, चिंचेचा कोळ, गूळ, मीठ घालून मिक्सरला लावा. अगदी थोडे पाणी घाला.
३. तेलात हिंग, मोहरी, हळद याची फोडणी घाला.अशा चटणीमुळे जेवणात चव येते.
No comments:
Post a Comment