Showing posts with label Chatni Recipes. Show all posts
Showing posts with label Chatni Recipes. Show all posts

Friday, October 5, 2012

Papdachi Chatni Recipe | पापडाची चटणी


साहित्य :
Papadachi Chatni Recipe
  • ३-४ लिज्जत पापड  
  • किंचित लाल तिखट (आवडीनुसार)
  • मीठ चवीनुसार 
  • तेल तळण्यासाठी 
कृती :
  1. प्रथम तेल गरम करून त्यात पापड तळून घ्या. नंतर तळलेल्या पापडाचा चुरा करुन त्यात लाल तिखट, मीठ टाकून सगळे साहित्य एकत्र करा.
  2. सर्व्ह करा गरम वरण-भाता सोबत किंवा खिचडी सोबत..
टीप :
पापडाची चटणी २-३ दिवस टिकते फक्त हवा बंद डब्यात ठेवावी.


Sunday, September 9, 2012

Amla Chatney Recipe | आवळ्याची चटणी

साहित्य :
  •  ६ आवळे 
  • १ टीस्पून जिरे 
  • १/२ खवलेला नारळ 
  • १/४ वाटी कच्चे शेगदाणे 
  • ५ हिरव्या मिरच्या 
  • १ तुकडा आले 
  • थोडी कोथिबीर 
  • चवीला मीठ व गूळ 
कृती :

    १. आवळे किसून घ्यावे व बाकी सर्व पदार्थ एकत्र करून चटणी करावी.

टीप : आवळा खाल्ला जातो व बरेच दिवस टिकते .

लाल भोपळयाच्या सालीची चटणी (Lal Bhoplaychaya Salichi Chatney Recipe)

साहित्य :
  • लाल भोपळयाच्या अगदी बारीक कापलेल्या साली १/२ वाटी 
  • १/४ वाटी तीळ 
  • सुक्या खोबऱ्याचा कीस किवां ओल्या नारळचा चव १/२ वाटी 
  • ३-४ लाल सुक्या मिरच्या 
  • गूळाचा लहान खडा 
  • लिबू एवडा चिचेचा कोळ 
  • चवीपुरते मीठ 
  • फोडणीसाठी तेल २ टीस्पून 
  • अंदाजे मोहरी, हिंग,हळद 
कृती :

 १. तीळ व खोबऱ्याचा कीस मंद आचेवर कढईत भाजून घ्यावा.नंतर त्यात लाल मिरच्या टाकून भाजाव्या.
 २. मग त्यात सालीही परतून घ्यावा.हे सगळे भाजलेले पदार्थ, चिंचेचा कोळ, गूळ, मीठ घालून मिक्सरला लावा. अगदी थोडे पाणी घाला.
३. तेलात हिंग, मोहरी, हळद याची फोडणी घाला.अशा चटणीमुळे जेवणात चव येते.  

सहा रसांची चटणी (6 Rasanchi Chatney Recipe)

साहित्य :
  • १ कैरी किसून 
  • १/२ नारळ खवून 
  • कडीलिबाची १० पाने धुऊन 
  • १/४ वाटी शेगदाणे 
  • थोडा गूळ 
  • १ टीस्पून लाल तिखट (आवडीनुसार)
  • मीठ चवीनुसार 
  • १ टीस्पून जीर 
कृती :

१. कैरी कीस, नारळ, पाने, दाणे, गूळ, मीठ, तिखट, जिरे एकत्र वाटून चटणी करा. 

लसूणाची चटणी (Lasnachi Chatney Recipe)

साहित्य :
  • लसूण २ गड्डे 
  • मिरी  १ टीस्पून 
  • सुके खोबरे १/४ वाटी 
  • शेगदाणे थोडेसे (भाजलेले)
  • भाजकी चणाडाळ १ टीस्पून 
  • मीठ व साखर चवीनुसार 
कृती :

१. खोबरे भाजून घ्यावे व वरील सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमधून काढावे.

टीप :
 चटणीत एक बुटूक टाकावे.मिरी ऐवजी तिखट चालते पण मिरी पाचक असते व स्थुलता कमी करण्यास मदत करते.