Tuesday, September 18, 2012

Ukadiche Modak Recipe | उकडीचे मोदक

साहित्य :
Ukadiche Modak Recipe in marathi
 • २ वाट्या तांदूळ पिठी 
 • १ मोठा नारळ ( खवलेला )
 • २ टीस्पून तूप 
 • १/२ टीस्पून मीठ 
 • दीड वाटी गूळ (किसून घेतलेला/ बारीक करून घेतलेला)
 • १/२ टीस्पून वेलची पूड
 • किंचित जायफळ पूड 
 • २ टीस्पून खसखस (भाजून घेतलेली)
 • २ वाट्या पाणी
 •  सुका मेवा (Dry Fruits) -(आवडत असल्यास)
कृती :
 1. उकडीसाठी : २ वाट्या पाणी उकळत ठेवावे. त्यात मीठ  घालावे व उकळी आल्यावर तांदळाची पिठी घाला. उलटनीने ढवळून झाकण ठेवून २-३ वाफा आणून आच घालवा. ५ मिनिटे झाकण घालून तसच ठेवा नंतर परातीत थोड थोड घेवून छान मळून घ्या.
 2. सारणासाठी : खवलेले नारळ एका कढईत ५ मिनिटे परता, नंतर  त्यात १ टीस्पून तूप, गूळ टाका. गूळ विरघळला की आच काढा आणि त्यात खसखस आणि वेलची पूड, जायफळ पूड, सुका मेवा टाका मिश्रण एकजीव करा.
 3. आता मोदक करण्यासाठी उकडीचा लिंबाएवढा गोळा घेऊन तुपाचा हाताने त्याची वाटी करून त्यात २ चमचे सारण भरून कडेने चुण्या घालत तोंड बंद करा. असे सगळे मोदक करून ओल्या फडक्याखाली झाकून ठेवा. मग मोदक पात्रात किंवा इडली पात्रात ठेवून वाफवा. मध्यम आचेवर उकडण्यास १०-१२ मिनिटे ठेवा. 
टीप :
  सकाळचे मोदक पुन्हा गरम करताना पाणी बुचकळून/शिंपडून मग उकडावे, परत ताज्यासारखे होतील.

2 comments: