साहित्य:
- १ वाटी आंबरस
- १ नारळ
- १ लहान वाटी गुळ
- वेलची पावडर
- पाव किलो तांदळाचे पीठ
कृती:
- १ नारळाचे खोबरे खणून त्यात आंबरस, गुळ, वेलची पूड घाला.
- नंतर त्याचे सारण करून घ्या.
- त्या नंतर एका पातेल्यात २ वाटी पाणी उकळून घ्या आणि पाणी उकल्यावर त्यात चवीनुसार मीठ, १/२ चमचा तूप,१/२ वाटी आंबरस व तांदलाचे पीठ घालून घोटून घ्यावे व २ मिनिटे झाकण लावून मंद आंचेवर ठेवून आंच बंद करावी.
- नंतर पीठ मळून घ्यावे.
- पीठाचे लहान गोळे करून घेऊन त्यात सारण भरून घ्या आणि मोदक तयार करून १० मिनिटे उकडण्यास ठेवावे.
No comments:
Post a Comment