साहित्य:
- सोयाबीन १०० ग्रॅम
- ६ बारीक चिरलेले कांदे
- अर्धी वाटी ओले खोबरे
- गरम मसाला
- आले-लसणाची पेस्ट
- कोथिंबीर
- हळद
- २ टी स्पून तिखट
- २ मोठे tomato
- जिरे
- अर्धी वाटी तेल
- मीठ
कृती:
- प्रथम सोयाबीन १५ मिनिटे पाण्यात भिजवून ठेवावे. नंतर ते चांगले धुऊन त्यातून फेसाळ पाणी काढून घ्यावे.
- नंतर कुकर मध्ये थोडा पाणी टाकून त्यात धुतलेले सोयाबीन टाका आणि २ शिट्या काढून घ्या.
- २ शिट्या काढून झाल्यानंतर एका पातेल्यात सोयाबीन काढून घ्यावेत आणि ते पुन्हा पाण्याखाली धुऊन घ्यावेत.
- नंतर कुकरमध्ये १ छोटी अर्धी वाटी तेल फोडणीसाठी टाकावे. नंतर त्यात १ टी-स्पून जिरे, बारीक चिरलेले कांदे गुलाबी होयीपर्यंत परतून घ्यावे.
- त्यात आले-लसणाची पेस्ट, कांदा-खोबऱ्याचे वाटण, बारीक चिरलेले tomato, हळद, चवीनुसार मीठ व २ टी-स्पून तिखट व धुतलेले सोयाबीन टाकून एकजीव होयीपर्यंत चांगले परतावे.
- मिश्रण एकजीव झाल्यावर एक मोठी वाटी पाणी टाकून २ शिट्या काढून घ्यावे.
- कुकर थंड झाल्यावर भाजी काढून त्यावर थोडी कोथिंबीर टाकून serve करावे.
Nice recipe....
ReplyDelete