साहित्य :
टीप :
जर पनीर घरी नसेल आणि दूध नासलं/ फाटलं असेल तर पनीर ऐवजी ते वापरू शकता. त्यातील पाणी काढून टाका आणि १५-२० मिनिटे कपडयात बांधून ठेवा.
- स्वीट कॉर्न १/२ वाटी
- पनीर १/२ वाटी (किसून बारीक केलेले)
- ओलं खोबर खवलेले १/२ वाटी
- साखर १/४ वाटी
- गूळ १ वाटी (आवडीनुसार)
- वेलची पूड १/२ टीस्पून
- तूप ३-४ टीस्पून
- काजू- बदामचे बारीक पावडर (मिक्सरमध्ये करून घेणे )
- सजवण्यासाठी मनुके
- प्रथम स्वीट कॉर्न मिक्सर मधून वाटून पेस्ट करून घ्या ( पाणी अजिबात घालू नका). मग एका नॉन स्टिक कढईत तूप गरम करून त्यात स्वीट कॉर्न पेस्ट १०-१५ मिनिटे परतून घ्या.
- मग त्यात पनीर घालून ५-१० मिनिटे परतून घ्या. नंतर त्यात ओलं खोबर, गूळ, साखर घाला. मिश्रण नीट एकजीव करून १५-२० मिनिटे परता.
- त्यात वेलची पूड घालून मिश्रण एकजीव करा आणि आच घालवा. एका ताटाला तूपाच हात लावून मिश्रण पसरून थंड करण्यास ठेवा. त्यावर काजू -बदामची पावडर टाका. थोड थंड (Room Temperature ) झाले की फ्रीजमध्ये १ तास ठेवा.
- नंतर त्याच्या वड्या पाडा आणि सर्व्ह करताना मनुकाने सजवा.
टीप :
जर पनीर घरी नसेल आणि दूध नासलं/ फाटलं असेल तर पनीर ऐवजी ते वापरू शकता. त्यातील पाणी काढून टाका आणि १५-२० मिनिटे कपडयात बांधून ठेवा.
No comments:
Post a Comment