साहित्य :
- १ कप साबुदाणा
- १ बटाटा बारीक काप केलेला
- ३ टेबलस्पून शेंगदाणा कूट
- ३ टेबलस्पून खवलेले ओल खोबर
- ३ बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या
- १/२ टीस्पून जीर
- १ टीस्पून साखर
- मीठ चवीनुसार
- २ टीस्पून तूप
- १ टेबलस्पून लिंबूचा रस
- बारीक कापलेली कोथिंबीर (आवडत असल्यास)
- प्रथम साबुदाणा २-३ वेळा पाण्याने धुवून ३/४ कप पाणी टाकून ५-६ तास भिजवत ठेवा. साबुदाणा नीट भिजला की तो हाताने मोकळा करून घ्या.
- नंतर त्यात मीठ, साखर, शेंगदाण्याचा कूट घालून साबुदाणा एकजीव करून घ्या.
- एका कढईत तूप गरम करून त्यात जीराची फोडणी घाला, जीर तडतडले की त्यात मिरच्या, बटाटाचे काप आणि थोड मीठ टाका आणि नीट परतून झाकण ठेवून एक वाफ आणा म्हणजे बटाटा शिजेल.
- आता त्यात साबुदाणा टाकून परतून घ्या आणि पुन्हा झाकण ठेवून एक वाफ काढा.
- वाफ आली की त्यात कोथिबीर, ओलं खोबर आणि लिंबू रस टाकून नीट एकजीव करा. गरमागरम सर्व्ह करा, दही किंवा लिंबाच्या गोड लोणच्या सोबत.
No comments:
Post a Comment