Thursday, September 27, 2012

Black Peas Curry Recipe | काळ्या वाटाण्याची आमटी

Kala vatana amti recipe in marathi
साहित्य :
 • १ कप काळा वाटणा 
 • (१/४ कप ओलं खोबऱ्याचे तुकडे  + ५-६ लसून पाकळ्या  + १ इंच आलं+ थोड पाणी ) पेस्ट
 • २  बारीक कापलेले कांदे 
 • १ बारीक कापलेला Tomato 
 • १/२ टीस्पून जीर 
 • १/२ टीस्पून मोहरी 
 • १/४ टीस्पून हिंग 
 • थोडा कढीपत्ता  
 • १ टीस्पून लाल तिखट (आवडीनुसार)
 • १ टीस्पून गरम मसाला (आवडीनुसार )
 • १/४ टीस्पून हळद  
 • मीठ चवीनुसार  
 • थोडीशी बारीक कापलेली कोथिबीर   
कृती : 
 1. काळा वाटणा ७-८ तास भिजवत ठेवून नंतर धुवून कुकर मध्ये मीठ, २ कप पाणी टाकून शिजवून घ्या. जास्तीच पाणी फेकू नका. (जर वाटाण्याला मोड आणायचे असतील तर भिजवून झाले की  एका कपड्यात ५-७ तास बांधून ठेवा)
 2. एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जीर, हिंग, कढीपत्त्याची फोडणी घाला. जीर तडतडले की त्यात कांदा टाकून गुलाबी होऊ पर्यत परता मग त्यात (आलं+लसून +खोबर ) पेस्ट घाला.
 3. कांदा आणि पेस्ट ५ मिनिटे परता मग त्यात लाल तिखट, गरम मसाला, हळद, Tomato, किंचित मीठ घालून परता नंतर ५-७ मिनिटे झाकण ठेवून एक वाफ काढा. मसाल्याला तेल सुटयाला लागल की  त्यात वाटण्यामधले थोडं पाणी घाला आणि मसाला एकजीव करून ५ मिनिटे मसाला शिजू दया.
 4. नंतर त्यात काळा वाटाणा आणि उरलेलं पाणी (पाणी कमी असेल तर थोड साध पाणी टाका) टाकून एक उकळ आणा.
 5. सर्व्ह करताना वरून कोथिंबीर घाला. ही आमटी आंबोळी किंवा डोसा सोबत खाल्यास छान लागते.
टीप :
ओलं खोबरं ऐवजी सुक खोबर पण वापरता येईल. फक्त सुक खोबर तव्यावर भाजून घ्या मग पेस्ट करा.

No comments:

Post a Comment