साहित्य :
- १/२ किलो बोनलेस बारीक कापलेले चिकन
- २-३ टीस्पून तंदुरी मसाला
- १/४ टीस्पून लाल रंग (आवडत असल्यास )
- १ १/२ वाटी दही (फेटलेले)
- धणे -जीर पूड आवडीनुसार
- मीठ चवीप्रमाणे
- लाल तिखट आवडीनुसार
- हिरवी मिरची + कोथिबीर पेस्ट (आवडीनुसार)
- १ टीस्पून आलं -लसून पेस्ट
- १ लिबचा रस
- १/२ टीस्पून हळद
- तळण्यासाठी तेल
कृती:
१. प्रथम चिकनला मीठ, लिबू रस लावून २०-२५ मिनिटे ठेवा.
२. नंतर दही, लाल रंग, तंदुरी मसाला, आल-लसून पेस्ट, मिरची-कोथिबीर पेस्ट, हळद, धणे-जिरे पूड,लाल तिखट लावून १/२ तास ठेवणे.
३. नंतर डीप फ्राय करुन टीशू पेपर वर ठेवा. तयार आहे चिकन पॉपकॉर्न !!
No comments:
Post a Comment