Thursday, September 6, 2012

Apple Halwa | सफरचंदचा हलवा

साहित्य :

  • १ १/२ टीस्पून तूप 
  • २ १/२ कप किसलेले सफरचंद  
  • १/४ कप मावा 
  • ३/४ कप दुध 
  • ३ १/२ टीस्पून साखर 
  • १/४ कप कापलेले अक्रोड,काजू,बदाम तुकडे 
  • Vanilla Essence २-३ थेंब 

कृती :

१  . नॉन-स्टिक कढई मध्ये तूप गरम करा मग त्यात सफरचंद घाला. मंद आचेवर ५-७ मिनिटे सारखे हलवत राहा.

२ . आता मावा टाका आणि २-३ मिनिटे हलवा.

३ . नंतर दुध टाकून ७-८ मिनिटे हलवा .

४ . आता साखर आणि कापलेले Dry फ्रुट तुकडे टाका. मंद आचेवर ७-८ मिनिटे हलवत राहा जोपर्यत त्यातील पाणी कमी होत नाही. 

५ . पाणी आटलं की आच घालावा आणि त्यात आता Vanilla Essence घाला.(Vanilla Essence नसलातर वेलची पूड घाला)

टीप : सफरचंद कापले असता ते काळे होते तर एक-एक करून किसा आणि ते मिठाच्या पाण्यात ठेवले असता काळ होत नाही(कीस करण्यापूर्वी). 



No comments:

Post a Comment