साहित्य:
- १ वाटी काकडीचा किस
- १ वाटी तांदळाचे पीठ
- १ वाटी कणिक (गरजे प्रमाणे कमी जास्त )
- हिरवी मिरची
- आलं लसून पेस्ट
- मीठ चवीनुसार
- जीरेपुड
- तेल
- चिमुटभर खाण्याचा सोडा
कृती:
- काकडी किसून घ्यावी ( शक्यतो कोवळ्या काकडीचा वापर करावा )
- त्यात हिरवी मिरची, आलं लसून पेस्ट, जिरेपूड, मीठ, घालावे. त्याला पाणी सुटतेच.
- त्यात तांदळाचे पीठ, कणिक व गरजे प्रमाणे पाणी घालून पातळसर कालवावे.
- चिमुटभर खाण्याचा सोडा घालावा व नेहमी प्रमाणे तव्यावर तेल सोडून धिरडी बनवावीत.
- दोन्ही बाजूने भाजावेत.
- खोबऱ्याची चटणी किंवा tomato सॉस बरोबर serve करावे.
टीप:
काकडी ऐवजी मुळा, गाजर वा दुधी भोपळा किसून घालूनही धिरडी बनवता येतील.
No comments:
Post a Comment