साहित्य :
- २ वाटी कोलंबी / करंदी (छोटी कोलंबी )
- २ कांदे बारीक कापलेले
- २ टीस्पून आल-लसून पेस्ट
- १/२ टीस्पून हळद
- १ टीस्पून लाल मिरची पावडर
- मीठ चवीनुसार
- तेल
- १ टीस्पून लिबू रस
- कोथिबीर कापून घेतलेली
- (कव्हरसाठी) : ५-६ बटाटे उकडून लगदा करून
- १/२ वाटी बेसन व मीठ चवीनुसार
कृती :
१.प्रथम तेलावर कांदे परतून घेवून त्यावर आल-लसून पेस्ट, हळद, मिरची पावडर घालून परतणे.
२. त्यावर कोलंबी व मीठ घालून कोरडेच शिजवावे.लिबु रस घालावा.कोथिबीर घालून सारण थंड कराव.
३. कव्हरसाठी दिलेले साहित्य एकत्र करून नीट मळावे.बटाट्याच्या चिगटपणानुसार बेसनचे प्रमाण कमी-जास्त करावे.या मिश्रणाचा लिबूएवडा गोळा करून त्याला वाटीसारखा आकार देऊन त्यात वरील कोलंबीचे सारण भरून बंद करून चपटा आकार घ्यावा. असे सगळे patice करून घ्यावेत.
४. आता नॉनस्टिक तव्यावर तेल सोडून त्यात हे patice shallow फ्राय करावेत.
५. सॉस सोबत सर्व्ह करा.
टिप : जर बेसन आवडत नसेल तर ब्रेड क्रब्स घेवू शकतात.
No comments:
Post a Comment