साहित्य :
- १ कप मुगाची डाळ
- १/२ कप चना डाळ
- २ कांदे बारीक कापलेले
- धणे अर्धवट कुटून
- १ टीस्पून जिरे
- ३-४ हिरव्या मिरच्या
- १ इंच आल
- २ टीस्पून ओवा
- १/२ टीस्पून हळद
- १ चिमुट खाणायचा सोडा
- पाणी
- कोथिबीर बारीक कापलेली
- तेल तळणासाठी
- मीठ चवीनुसार
- प्रथम दोन्ही डाळी धुऊन वेगवेगळ्या ९० मिनिटे भिजत ठेवा.
- नंतर दोन्ही डाळी(वाटताना डाळीची पूर्ण पेस्ट करू नका अर्धवट पेस्ट करा), जिरे, मीठ, मिरच्या, आल आणि थोडच पाणी (लागले तरच) घालून मिक्सर मधून वाटून घ्या. मग त्यात हळद, धने, ओवा, सोडा, कांदा, कोथिबीर घालून एकाच बाजूने भजीच मिश्रण ढवळा.
- ५-१० मिनिटांनी तेलात डीप फ्राय करा. गरमागरम भजी Tomato सॉस सोबत सर्व्ह करा :-).
No comments:
Post a Comment