साहित्य:
- २ मोठी कच्ची केळी
- भाजलेल्या शेंगदाण्याचा अर्धी वाटी कूट
- अर्धा चमचा लाल तिखट किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा
- १ चमचा जिरेपूड
- चवीपुरते मीठ
- थोडेस तूप
कृती:
- साले काढून केळी किसावीत, त्यात दाण्याचा कूट, तिखट, जिरेपूड, मीठ घालून कालवावे.
- प्लास्टिकच्या कागदावर लहान लहान थालीपीठे थापावीत.
- तव्यावर थोडे तूप घालून दोन्ही बाजूंनी थालीपीठे भाजावी.
No comments:
Post a Comment