साहित्य :
- मारी बिस्कीटे (Marie Biscuits) - १६
- दुध १/२ लिटर
- साखर- ५ टेबलस्पून
- कोको पावडर- ३ टेबलस्पून
- क्रॉनफ्लॉवर - ३ टेबलस्पून
- Instant Coffee Powder - १ टिस्पून मिक्स with ५-६ टेबलस्पून इन Hot Water
- सजावटीसाठी- चॉकलेट चिप्स,चॉकलेट Curls, Nuts (काजू-बदामचे तुकडे )
कृती :
१. प्रथम मारी बिस्कीटे दोन्ही बाजूंनी Instant Coffee मिश्रणात डीप करा आणि मग एका चौकोनी बाउल मध्ये ठेवा.
२. नंतर एका बाउल मध्ये कोको पावडर, कोर्नफ्लावर आणि थंड दुध १/४ कप, नीट एकत्र करा.( गूठळ्या होऊ देऊ नका)
३. एका पातेल्यात/Pan मध्ये दुध गरम करायला ठेवा त्यात साखर घाला. उकळी आली की त्यात वरील (कोको पावडर + कॉर्नफ्लावर ) मिश्रण टाकून नीट ढवळा.सतत ढवळत राहा.
४. मिश्रण घट्ट होत आल की आच घालवा आणि ते मिश्रण गरम असतना मारी बिस्किटावर टाका. हा सॉस सगळ्या बिस्किटावर पसरेल असा टाकावा.
५. आता Nuts/ काजू-बदाम, चॉकलेट चिप्स,Curls ने सजवा.
६. थंड करण्यास ५-६ तास फ्रीज मध्ये ठेवा. थंड सर्व्ह करा. Yummy :-)
No comments:
Post a Comment