साहित्य :
- कापलेली पाव किलो भेंडी
- ४ चमचे दही + १ चमचा बेसन + ४ चमचे पाणी (रवीने ढवळून घेणे)
- १-२ चमचा आल-लसून-हिरवी मिरची-जीर पेस्ट
- चवीनुसार मीठ
- १/२ चमचा मोहरी
- १/४ चमचा हिंग
- कढीपत्ता
- तेल फोडणी साठी
- सजावटी साठी कोथबीर
कृती :
- प्रथम तेल तापवावे त्यात मोहरी,हिंग, कढीपत्ता ची फोडणी ध्यावी.
- मग त्यात पेस्ट टाकून परतावी.
- नंतर त्यात भेंडी टाकावी आणि मग नंतर ताक (वरील मिश्रण दहीच ) आणि मीठ टाकून झाकण ठेवून एक वाफ काढावी.
- कोथबीर टाकून सजावट करावी.
No comments:
Post a Comment