साहित्य :
- उकडलेली अंडी - ३
- चीझचा कीस - १ वाटी
- चवीनुसार तिखट+मीठ+मोहरी पूड याचे मिश्रण
- Tomato सॉस - अर्धी वाटी
- बटाटा सळी किवां कुरकुरे वाटीभर
कृती :
अंडी सोलून मधोमध चिरा. अलगत पणे आतील पिवळा भाग काढा. एका बाऊल मध्ये मीठ, मसाले, चीज, सॉस घालून एकत्र करा. डेकोरेटींग पिशवी ( Decorating Bag ) मध्ये ते मिश्रण भरा आणि पांढऱ्या भागाच्या पोखळीत, केक मध्ये जसा क्रीम भरतात तस भरा आणि बटाटा सळी / कुरकुरे ने सजवा.
टिप : डेकोरेटींग पिशवी नसेल तर प्लास्टिक च्या पिशवीच्या भेळ च्या पेपर प्रमाणे रोल करून स्टफ करू शकता .
No comments:
Post a Comment