साहित्य :
- चिकन - वीथ बोन - अर्धा किलो
- धणे - २ टीस्पून
- जिरे - १ टीस्पून
- काळी मिरी - १ टीस्पून
- तेजपान - १
- दालचिनी - १ तुकडा
- हिरवी वेलची - ४-५
- स्टार फुल (चक्री फुल )-१
- तीळ - २ टीस्पून
- खसखस - ३ टीस्पून
- सुके खोबरे किसलेले - ४-५ टीस्पून
- लवंग - ४-५
- हिरवी मिरची - ५-६
- कोथिबीर - १ जुडी
इतर साहित्य :
- तेल - ४-५ टेबल स्पून
- बारीक चिरलेला कांदा - २ मोठे कांदे
- आलं-लसून पेस्ट - ३-४ टीस्पून
- हळद - १ टीस्पून
- मीठ -२-३ टीस्पून
कृती :
- चिकन नीट धुवून त्याला मीठ, हळद, आलं-लसून पेस्ट, लावून ठेवून घ्या . साधारणपणे १ तास तरी असच ठेवा .
- मंद आचेवर मसाल्यासाठी दिलेलं साहित्य भाजून घ्या. भाजून झाल्यावर सगळ्यात शेवटी हिरवी व कोथबीर टाका व आच घालवून थंड झाला कि पाणी टाकून वाटून घ्या.कढईत तेल गरम करून त्यात कांदा लाल होईपर्यत परतून घ्या. आता त्यात चिकन टाकून छान परतून घ्या.
- थोडं गरम पाणी टाकून मंद आचेवर चिकन १०-१५ मिनिटे शिजवून घ्या . मग त्यात वाटलेला हिरवा मसाला टाका . आवश्यक असल्यास पाणी टाका व चिकन नीट शिजवून घ्या आणि गरमागरम भाकरीबरोबर सर्व्ह करा .
टीप : वाटलेला हिरवा मसाला शक्यतो शेवटी टाका, म्हणजे जास्त काळा होणार नाही. खोबर किसायाच्या आधी वरचा काळा भाग काढून घ्या, म्हणजे आपला मसाला जास्त काळा होणार नाही .
nice
ReplyDeleteNICE RECIPE
ReplyDelete