Sunday, October 14, 2012

Chana Dal Vada Recipe ( चणा डाळ वडे )

साहित्य:
  Chana Dal Vada Recipe in marathi
 • 250 ग्रॅम चणा डाळ 
 • ४ बारीक चिरलेले कांदे 
 • १ इंच आले 
 • १०-१२ लसुणाच्या पाकळ्या 
 • ७-८ हिरव्या मिरच्या 
 • वाटीभर चिरलेली कोथिंबीर 
 • १ टेबलस्पून तिखट 
 •  चिमुटभर हळद 
 • चवीनुसार मीठ 
 • तेल  
कृती :
 1. प्रथम चण्याची डाळ २-३ तास भिजत ठेवावी. नंतर ती धूउन चाळणीत टाकावी.
 2. मग ती मिक्सर मध्ये घालून त्यात हिरवी मिरची, आले, लसूण आणि मीठ टाकून जाडसर वाटून घ्यावे.
 3. नंतर ती मिक्सर मधून एका पातेल्यात काढून घ्यावी व त्यात बारीक चिरलेला कांदा, हळद, तिखट  आणि कोथिंबीर घालून, या सर्वांचे मिश्रण एकत्र करून घ्यावे.
 4. नंतर या मिश्रणाचे लहान चपट्या आकाराचे गोल वडे करून तेलात डीप फ्राय करून घ्यावे.
 5. नंतर गरमा गरम वडे, tomato सॉस किंवा पुदिण्याचा चटणी बरोबर सर्व्ह करावे.

1 comment: