Thursday, November 1, 2012

Kadhi Recipe-कढी

साहित्य :
 • १ कप दही 
 • २ टीस्पून बेसन
 • ४  पाकळ्या लसून 
 • १ इंच आलं 
 • २-३ हिरव्या मिरच्या 
 • १ टीस्पून जीर
 • १/२ टीस्पून मोहरी
 • किंचित हळद (आवडत असल्यास) 
 • कढीपता १ काडी 
 • हिंग किंचित 
 • कोथिबीर सजावटी साठी 
 • किंचित साखर (आवडत असल्यास )
 • चवीपुरते मीठ 
 • २ टीस्पून तेल 
कृती :
 1. प्रथम दह्यात बेसन टाकून रवीने घुसळून घ्या.त्यात आवश्यक तेवढे (२-३ कप साधारण)पाणी टाका.
 2. नंतर मिक्सरमधून आलं, लसून, जीर, मिरच्या,कढीपता वाटून घ्या. कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, आणि वाटण टाका.
 3. मग लगेच ताक मग त्यात हळद, मीठ, साखर टाका. एक कढ आणा आणि लगेच आच घालवा.
 4. कोथिबीर बारीक कापून कढीवर टाका. गरमागरम भाता सोबत सर्व्ह करा.

टीप :
कढीमध्ये साधी बेसन भजी टाकली तरी सुद्धा कढी छान लागते.(भजी कढीला कढ आल्यावर टाकावी, म्हणजे भजी मुरतील कढीत ) 
हिरव्या मिरची ऐवजी सुक्या काश्मिरी मिरच्याची पण फोडणी देता येईल.

No comments:

Post a Comment