साहित्य:
कृती:
- ५ - ६ अळूची पाने
- २०० ग्रॅम बेसन
- १ वाटी चिंचेचा कोळ
- १ लहान वाटी गुळ
- १ चमचा जिरे
- तिखट
- मीठ
- हळद
- १ टेबल स्पून तेल
- २ वाट्या बेसन
कृती:
- अळूची पाने धुऊन घ्यावी. बेसन, १ चमचा तिखट, गुळ, चिंचेचा कोळ, चवीनुसार मीठ, हळद, जिरे यांचे मिश्रण एकत्र करून, थोड पातळ कालवून घ्या.
- नंतर हे मिश्रण पानाच्या उलट्या बाजूला लावावे व दोन्ही बाजूने दुमडून नंतर त्याचा रोल तयार करावा.
- हा रोल चाळणीत किंवा इडलीपात्रात १५ मिनिट उकडून घ्यावे.
- नंतर गार झाल्यावर छोट्या छोट्या वड्या पातळ कापून घ्याव्यात.
- या वड्या डीप फ्राय करून सॉस बरोबर सर्व्ह कराव्या.
No comments:
Post a Comment