Showing posts with label Fish Recipes. Show all posts
Showing posts with label Fish Recipes. Show all posts

Sunday, November 18, 2012

Fish Fry Recipe | Halwa Fish Fry

साहित्य :
    Black Pomfret Recipe
  • २ हलवे (तुकडे करून धुवून घेतले)
  • १ टेबलस्पून आलं-लसून-हिरवी मिरची पेस्ट (साधारण एक इंच आलं, ५ पाकळ्या लसून,२-३ हिरव्या मिरच्या )
  • १/२ टीस्पून हळद 
  • लाल तिखट आवडीनुसार 
  • गरम मसाला पावडर आवडीनुसार  
  • अर्ध्या लिंबुचा रस 
  • मीठ चवीनुसार 
  • १/४ वाटी रवा  
  • तेल फ्राय करण्यासाठी
  • कोथिबीर बारीक कापलेली  
कृती :
  1. प्रथम माश्यांच्या तुकड्यांना मीठ, हळद, लिंबू रस लावून १० मिनिटे ठेवा मग त्यातले पाणी काढून टाकून त्याला आलं - लसून पेस्ट, तिखट, गरम मसाला पावडर लावून १५-२० मिनिटे ठेवा.
  2. नंतर रवा लावून Shallow फ्राय करा. आणि कोथिबीरने गार्निश करून गरमागरम सर्व्ह करा.

Sunday, October 7, 2012

Fish Fry Recipe | Mackerel (Bangda Fry)

 साहित्य:
  • ४ बांगडे 
  • तिखट, मीठ, हळद
  • ३ टेबलस्पून बारीक रवा 
  • २ टेबलस्पून  तांदळाचे पीठ 
  • २ टेबलस्पून कोकमाचे आगळ 
  • तेल  

 कृती:
  1. प्रथम बांगडा साफ करून धुवून घ्या. नंतर बांगड्याला सुरीने आडव्या चिरा द्या. नंतर कोकमाचे आगळ, १ चमचा तिखट, चिमुटभर हळद, चवीनुसार मीठ हे सर्व एकत्र करून बांगडयास १५ मिनिटे लावून ठेवावे.
  2. नंतर  बारीक रवा, तांदळाचे पीठ, चिमुटभर हळद, २ टेबलस्पून तिखट, चवीनुसार मीठ या सर्वांचे सुके मिश्रण तयार करून बांगडयास लावून, बांगडे नॉन स्टीक तव्यामध्ये दोन्ही बाजूने १०-१५ मिनिटे  Shallow फ्राय करून घ्यावेत.


Apple iPad MD328LL/A (16GB, Wi-Fi, White) NEWEST MODEL
HDE ® Facial Hair Remover Threading Beauty Tool

Thursday, September 6, 2012

Fish Cutlet Recipe | फिश वडा

साहित्य :
  • खवले व काटे काढून साफ केलेली -उकडलेली मासळी (आवडते मासे पोप्लेट/सुरमई)-२२५ ग्राम 
  • उकडून मऊ केलेले बटाटे -१२५ ग्राम 
  • ब्रेड क्र्ब्ज -लागतील तसे 
  • तेल तळन्यासाठी 
  • मीठ चवीनुसार 
  • एक अंडे फेटून (आवडत असल्यास )
  • किसलेला कांदा - १ १/२ टीस्पून (१ कांदा मध्यम आकाराचा )
  • वाटलेली हिरवी मिरची चवीनुसार 
  • आल-लसून पेस्ट चवीनुसार 
  • कोथिबीर चिरून बारीक केलेली 
कृती :

  मासळी, बटाटे, मीठ, मिरची वाटण, कांदा, आल -लसून पेस्ट, कोथिबीर एकत्र करा .
  त्यात अंड घाला. एकजीव करा. पाणी वापरू नका . 
  मिश्रणाचे वडया-प्रमाणे गोळे करा नी ब्रेड क्र्ब्ज मध्ये घोळुन .
  नंतर गरम तेलात, दोन्ही बाजूंनी लालसर होईपर्यत तळा.आणि सॉस सोबत गरमागरम खा .

टिप :  जर डीप फ्राय आवडत नसेल तर रवा लावून Shallow Fry करा .