Showing posts with label Ganesh Chaturthi Special. Show all posts
Showing posts with label Ganesh Chaturthi Special. Show all posts

Friday, September 21, 2012

Mango Modak Recipe | आंबा मोदक

Mango Modak Recipe in marathiसाहित्य: 
  • १ वाटी आंबरस 
  • १ नारळ 
  • १ लहान वाटी गुळ 
  • वेलची पावडर 
  • पाव किलो तांदळाचे पीठ 
कृती:
  1. १ नारळाचे खोबरे खणून त्यात आंबरस, गुळ, वेलची पूड घाला.
  2. नंतर त्याचे सारण करून घ्या.
  3. त्या नंतर एका पातेल्यात २ वाटी पाणी उकळून घ्या आणि पाणी उकल्यावर त्यात चवीनुसार मीठ,  १/२ चमचा तूप,१/२ वाटी आंबरस व तांदलाचे पीठ घालून घोटून घ्यावे व २ मिनिटे झाकण लावून मंद आंचेवर ठेवून आंच बंद करावी. 
  4. नंतर पीठ मळून घ्यावे.
  5. पीठाचे लहान गोळे करून घेऊन त्यात सारण भरून घ्या आणि मोदक तयार करून १० मिनिटे उकडण्यास ठेवावे.

Tuesday, September 18, 2012

Ukadiche Modak Recipe | उकडीचे मोदक

साहित्य :
Ukadiche Modak Recipe in marathi
  • २ वाट्या तांदूळ पिठी 
  • १ मोठा नारळ ( खवलेला )
  • २ टीस्पून तूप 
  • १/२ टीस्पून मीठ 
  • दीड वाटी गूळ (किसून घेतलेला/ बारीक करून घेतलेला)
  • १/२ टीस्पून वेलची पूड
  • किंचित जायफळ पूड 
  • २ टीस्पून खसखस (भाजून घेतलेली)
  • २ वाट्या पाणी
  •  सुका मेवा (Dry Fruits) -(आवडत असल्यास)
कृती :
  1. उकडीसाठी : २ वाट्या पाणी उकळत ठेवावे. त्यात मीठ  घालावे व उकळी आल्यावर तांदळाची पिठी घाला. उलटनीने ढवळून झाकण ठेवून २-३ वाफा आणून आच घालवा. ५ मिनिटे झाकण घालून तसच ठेवा नंतर परातीत थोड थोड घेवून छान मळून घ्या.
  2. सारणासाठी : खवलेले नारळ एका कढईत ५ मिनिटे परता, नंतर  त्यात १ टीस्पून तूप, गूळ टाका. गूळ विरघळला की आच काढा आणि त्यात खसखस आणि वेलची पूड, जायफळ पूड, सुका मेवा टाका मिश्रण एकजीव करा.
  3. आता मोदक करण्यासाठी उकडीचा लिंबाएवढा गोळा घेऊन तुपाचा हाताने त्याची वाटी करून त्यात २ चमचे सारण भरून कडेने चुण्या घालत तोंड बंद करा. असे सगळे मोदक करून ओल्या फडक्याखाली झाकून ठेवा. मग मोदक पात्रात किंवा इडली पात्रात ठेवून वाफवा. मध्यम आचेवर उकडण्यास १०-१२ मिनिटे ठेवा. 
टीप :
  सकाळचे मोदक पुन्हा गरम करताना पाणी बुचकळून/शिंपडून मग उकडावे, परत ताज्यासारखे होतील.

Coconut Barfi Recipe


साहित्य :
    Dessicated Coconut Barfi Recipe in marahti
  •  पाव  किलो डेसिकेट कोकोनट 
  •  १०० ग्राम मावा 
  •  १ १/२ वाटी साखर 
  • १/२ वाटी दूध 
  • १-२ टीस्पून तूप 
  • १ टीस्पून वेलची पूड 
  • बदामचे काप 
कृती :
  1. प्रथम नॉनस्टिक कढईत तूप टाकून त्यात डेसिकेट कोकोनट १० मिनिटे मंद आचेवर (डेसिकेट कोकोनट मंद आचेवर परता नाही कर ते करपू शकत) परतून घ्या आणि एका बाउलमध्ये काढा .
  2. नंतर कढईत मावा ५ मिनिटे परतून त्यात दूध, साखर टाकून ढवळा. 
  3. साखर विरघळी की त्यात डेसिकेट कोकोनट टाकून नीट मंद आचेवर परतत राहा जोपर्यत मिश्रण घट्ट होत नाही. मिश्रण घट्ट झाले की आच काढा. त्यात वेलची पूड टाका आणि मिश्रण पुन्हा एकदा एकजीव करा.
  4. एका पसरत ताटाला तूपाच हात लावून त्यावर हे मिश्रण पसरवा आणि सुरीने वड्या पाडून त्यावर बदामचे काप ठेवा. मिश्रण थंड झाले की वड्या सर्व्हिंग बाउल काढा.

Kaju Modak Recipe | काजू मोदक

साहित्य :
Kaju Modak Recipe in marathi
  •  अर्धा किलो ताजा खवा 
  •  पाव किलो काजू तुकडा 
  • २ वाट्या पिठी साखर 
  • १ टीस्पून वेलदोडा पूड 
  • थोड दूध ( काजू भिजवण्यापुरत )
कृती:
  1. काजू दुधात भिजत टाकून तासाभराने मिक्सर मध्ये  घ्यावे.
  2. खावा मंद आचेवर भाजून घेऊन त्यात काजूची पास्ते व पिठी साखर घालावी.
  3. एकसारखं परतून घेऊन घट्टसर गोळा तयार झाला की उतरून घ्यावे.
  4. थंड झाल्यावर वेलदोडा पूड त्यात मिसळून घ्या.
  5. नंतर साच्यात भरून छोटे छोटे मोदक बनवावेत.

Monday, September 17, 2012

Rava Modak Recipe | रव्याचे मोदक

साहित्य :
  • ३  वाटया अगदी बारीक रवा 
  • २ चमचे तूप 
  • चवीप्रमाणे मीठ  
सारणासाठी : १ नारळ खवलेला, १ वाटी साखर किंवा गूळ , वेलची पूड, २ चमचे खसखस 

कृती :
  1. मंद आचेवर खवलेला नारळ परतून घ्या मग नंतर त्यात गूळ /साखर,खसखस घालून परता. गूळ/साखर विरघळला की आच घालून त्यात वेलची पूड घालून सारण थंड करण्यास ठेवा .
  2. ४ वाटी पाणी उकळण्यास ठेवणे.त्यात तूप व मीठ घालणे. पाण्याला उकळी आल्यावर त्यात रवा घालावा.चांगल्या वाफा आणून रवा शिजवून घ्या. मग तो परातीत घेवून तुपाचा हात घेवून चांगला मळून घ्या.
  3. नंतर मोदकाच्या साच्यात घालून करावे. मोदक करण्यापूर्वी साच्याला आतून पातळ तुपाचा हात लावावा. ह्या मोदकांना उकड काढ्याची गरज नाही.
टीप :
 मोदक साचा नसेल तर रव्याची पोळी लाटून त्यात सारण भरून मोदकांप्रमाणे आकार दयावा. 

Mawa Modak Recipe | Mava modak

साहित्य:
Mava Modak Recipe in marathi
  • अर्धा किलो ताजा खवा 
  • दीड वाटी पिठीसाखर 
  • पाव चमचा पिवळा खाण्याचा रंग 
  • १ टीस्पून वेलदोडा-जायफळाची पूड 

कृती:
  1. खवा मंद आचेवर गुलाबीसर भाजावा.
  2. मग त्यात पिठीसाखर घालून घोटत रहावं .
  3. मिश्रण पातळसर झाले की त्यात रंग व वेलदोड्याची पूड घालून एकत्र करून घ्यावे.
  4. थोडा वेळाने मिश्रण आळून घट्टसर झाले की ताटात पसरून गार करून घ्यावे.
  5. नंतर या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून साच्यात घालून मोदक करून घ्यावेत.

Batatyachi Bhaaji Recipe | बटाट्याची भाजी

साहित्य: 
Potato (Batatyachi suki bhaji recipe in marathi )
  • ५-६ मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे
  • ३-४ हिरव्या मिरच्या 
  • हिंग किंचित 
  • १ टीस्पून मोहरी 
  • १  टीस्पून जीर 
  • ५-६ पाकळ्या लसून बारीक कापलेल्या 
  • १ इंच आलं किसून 
  • १ काडी कढीपत्ता 
  • मीठ चवीपुरते 
  • १/२ टीस्पून साखर
  • कोथिबिर बारीक कापलेली  
कृती :

१. प्रथम कढईत तेल गरम करून त्यात हिंग, मोहरी, जीरं टाका, जीरं तडतडू लागले की त्यात लसून, कढीपत्ता, आलं, मिरची फोडणी घाला त्यात हळद घालून लगेच बटाटे, मीठ, साखर घालून भाजीचे मिश्रण एकजीव करा.

२. नंतर झाकण ठेवून ५ मिनिटे वाफ आणून आच घालवा. नंतर सर्व्ह करताना कोथिबिरने सजवा.