कृती :
- अर्धा किलो चिकन (मध्यम आकाराचे तुकडे करून घेणे )
- १ टीस्पून आलं लसूण पेस्ट
- १ टेबलस्पून गरम मसाला
- १ टीस्पून काळी मिरी पावडर
- १ टीस्पून हळद
- ७-८ लसूण पाकळ्या
- फोडणीसाठी तेल
- चवीनुसार मीठ
- बारीक चिरलेली कोथिबिर
- प्रथम चिकनला थोड मीठ लावून, थोडया पाण्यात कुकर मध्ये वाफवून घ्यावेत. नंतर जास्तीच पाणी बाजूला ठेवावं.
- एका मोठया कढईत तेल तापवून घ्याव आणि त्यात ठेचलेला लसूण घालावा तो लाल झाल्यानंतर त्यात आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, काळी मिरी पावडर, हळद, मीठ घालून परतावे.
- नंतर त्यात चिकणचे तुकडे घालून एक वाफ आणावी.नंतर त्यात बाजूला काढलेलं पाणी घालून झाकण ठेवून १०-१५ मिनिटे ठेवावे. झाकणात देखील पाणी ठेवावे.
- चिकण शिजल्यावर त्यावर कोथिबिर टाकून सर्व्ह करा.
This comment has been removed by a blog administrator.
ReplyDelete