साहित्य:
- 250 ग्रॅम चणा डाळ
- ४ बारीक चिरलेले कांदे
- १ इंच आले
- १०-१२ लसुणाच्या पाकळ्या
- ७-८ हिरव्या मिरच्या
- वाटीभर चिरलेली कोथिंबीर
- १ टेबलस्पून तिखट
- चिमुटभर हळद
- चवीनुसार मीठ
- तेल
- प्रथम चण्याची डाळ २-३ तास भिजत ठेवावी. नंतर ती धूउन चाळणीत टाकावी.
- मग ती मिक्सर मध्ये घालून त्यात हिरवी मिरची, आले, लसूण आणि मीठ टाकून जाडसर वाटून घ्यावे.
- नंतर ती मिक्सर मधून एका पातेल्यात काढून घ्यावी व त्यात बारीक चिरलेला कांदा, हळद, तिखट आणि कोथिंबीर घालून, या सर्वांचे मिश्रण एकत्र करून घ्यावे.
- नंतर या मिश्रणाचे लहान चपट्या आकाराचे गोल वडे करून तेलात डीप फ्राय करून घ्यावे.
- नंतर गरमा गरम वडे, tomato सॉस किंवा पुदिण्याचा चटणी बरोबर सर्व्ह करावे.
Mast recipe
ReplyDelete