साहित्य :
- १ खवलेला नारळ
- ७-८ सुकी आमसूल
- १-२ हिरवी मिरची
- ४-५ लसून पाकळ्या
- कोथिंबीर सजावटीसाठी
- मीठ चवीनुसार
- जीर पूड
- १/४ कप आंबट ताक (आवडत असल्यास)
- प्रथम ५-६ आमसूल १ १/२ कप गरम पाण्यात २५-३० मिनिटे भिजत ठेवून नंतर त्याला कुस्करून ते पाणी गाळून कोकम रस करून घ्या.
- नंतर २-३ आमसूल, खवलेला नारळ, मिरची, लसून आणि चवीपुरते मीठ मिक्सर मधून वाटून घ्या. मग त्या मिश्रणाला २ कप पाणी टाकून चाळणीने गाळून घ्या. पुन्हा त्यात २ कप पाणी टाकून गाळून घ्या.
- त्यात आता ताक आणि वरील कोकम रस टाकून ढवळा आणि थंड करणास फ्रीज मध्ये ठेवा.सर्व्ह करताना कोथिबीर टाका आणि जीर पूड भुरभुरा. (जीर पूड सर्व्ह करताना टाका, नाही तर सोल कढीचा रंग बदलेल.)
- सोल कढीला फोडणी देऊन गरम (जास्त गरम नाही कोमट) पण सर्व्ह करता येते. तूप/ तेलात जीरे टाकून फोडणी करा.
- सुक्या आमसुलान ऐवजी कोकम आगळ वापरून ही सोल कढी करता येते.
No comments:
Post a Comment