Pages

Tuesday, February 5, 2013

(Chicken in Garam Masala) गरम मसाल्यातलं चिकन

कृती :
  • अर्धा किलो चिकन (मध्यम आकाराचे तुकडे करून घेणे )
  • १ टीस्पून आलं लसूण पेस्ट 
  • १ टेबलस्पून गरम मसाला 
  • १ टीस्पून काळी मिरी पावडर 
  • १  टीस्पून हळद 
  • ७-८ लसूण पाकळ्या 
  • फोडणीसाठी तेल 
  • चवीनुसार मीठ 
  •  बारीक चिरलेली कोथिबिर 
साहित्य :
  1. प्रथम चिकनला थोड मीठ लावून, थोडया पाण्यात कुकर मध्ये वाफवून घ्यावेत. नंतर जास्तीच पाणी बाजूला ठेवावं.
  2. एका मोठया कढईत तेल तापवून घ्याव आणि त्यात ठेचलेला लसूण घालावा तो लाल झाल्यानंतर त्यात आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, काळी मिरी पावडर, हळद, मीठ घालून परतावे.
  3. नंतर त्यात चिकणचे तुकडे घालून एक वाफ आणावी.नंतर त्यात बाजूला काढलेलं पाणी घालून झाकण ठेवून १०-१५ मिनिटे ठेवावे. झाकणात देखील पाणी ठेवावे.
  4. चिकण शिजल्यावर त्यावर कोथिबिर टाकून सर्व्ह करा.

1 comment:

  1. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete