Pages

Tuesday, October 2, 2012

Arvi/Arbi Fry Recipe | अरवी फ्राय

साहित्य :
  1. १/२ किलो अरवी 
  2. किंचित लाल तिखट (आवडीनुसार तिखट)
  3. किंचित हळद 
  4. किंचित आमचूर पावडर
  5. १/४ टीस्पून चाट मसाला  
  6. मीठ चवीनुसार 
  7. तळण्यासाठी तेल 
  8. कोथिबीर सजावटीसाठी  
कृती :
  1. प्रथम अरवी पाण्याने धुवून घ्या. नीट वाळली की त्याची साले काढून टाकून ती डीप फ्राय (Deep Fry) करा. झाकण ठेवून डीप फ्राय करा आणि म्हणजे आरवी नीट शिजतील.
  2. नंतर अरवी तेलातून बाहेर काढल्यावर टिश्यू पेपर ठेवावी. मग ती थंड झाली की त्याला मधोमध सुरीने चीर पाडून त्यात वरील सर्व मसाले एकत्र करून ते प्रत्येक अरवीत तो मसाला भरून ती दाबून चपटी करा म्हणजे मसाला बाहेर येणार नाही.
  3. आणि पुन्हा एकदा १-२ टीस्पून तेल नॉन स्टिक कढईत टाकून ती मसाला भरलेली अरवी परतून घ्या.
  4. वरून कोथिबीरने सजवून सर्व्ह करा. चापटी किंवा खिचडी सोबत छान लागते आणि लहान मोठयांना आवडते.  As Starter पण सर्व्ह करू शकतो.
टीप :
  • अरवी उपासाला पण चालते फक्त त्यात चाट मसाला टाकू नका.
  • अरवी डीप फ्राय न करता उकडून पण घेऊ शकतो.

No comments:

Post a Comment