Monday, October 29, 2012

Masala Dudh Recipe - मसाले दूध

साहित्य :
  • दूध १ लीटर 
  • साखर पाऊण कप (आवडीनुसार)
  • आवडीनुसार ड्राय फ्रुट्स (काजू,बदाम,पिस्ता) तुकडे किंवा मिक्सर मधून पावडर करून घेणे
  • आवडत असल्यास चारोळी १/२ टीस्पून
  • केशर ४-५ काड्या 
  • वेलची पूड १/४ टीस्पून 
  • जायफळ पुड १/४ टीस्पून 
कृती:
    Masala Dudh
  1. दुध गरम करायाव्यास ठेवावे. दूधाला उकळी आल्यावर आच कमी करून दुध आटवून घ्यावे (साधारण २० मिनिटे ). 
  2. नंतर त्यात साखर घालावी साखर विरघळली कि त्यात ड्राय फ्रुट्स, चारोळी घालून एक उकळी आणावी.
  3. आच घालून त्यात वेलची पूड, जायफळ पूड, केशर घालावे. गरम सर्व्ह करावे.

Sunday, October 14, 2012

Chana Dal Vada Recipe ( चणा डाळ वडे )

साहित्य:
    Chana Dal Vada Recipe in marathi
  • 250 ग्रॅम चणा डाळ 
  • ४ बारीक चिरलेले कांदे 
  • १ इंच आले 
  • १०-१२ लसुणाच्या पाकळ्या 
  • ७-८ हिरव्या मिरच्या 
  • वाटीभर चिरलेली कोथिंबीर 
  • १ टेबलस्पून तिखट 
  •  चिमुटभर हळद 
  • चवीनुसार मीठ 
  • तेल  
कृती :
  1. प्रथम चण्याची डाळ २-३ तास भिजत ठेवावी. नंतर ती धूउन चाळणीत टाकावी.
  2. मग ती मिक्सर मध्ये घालून त्यात हिरवी मिरची, आले, लसूण आणि मीठ टाकून जाडसर वाटून घ्यावे.
  3. नंतर ती मिक्सर मधून एका पातेल्यात काढून घ्यावी व त्यात बारीक चिरलेला कांदा, हळद, तिखट  आणि कोथिंबीर घालून, या सर्वांचे मिश्रण एकत्र करून घ्यावे.
  4. नंतर या मिश्रणाचे लहान चपट्या आकाराचे गोल वडे करून तेलात डीप फ्राय करून घ्यावे.
  5. नंतर गरमा गरम वडे, tomato सॉस किंवा पुदिण्याचा चटणी बरोबर सर्व्ह करावे.





Sunday, October 7, 2012

Fish Fry Recipe | Mackerel (Bangda Fry)

 साहित्य:
  • ४ बांगडे 
  • तिखट, मीठ, हळद
  • ३ टेबलस्पून बारीक रवा 
  • २ टेबलस्पून  तांदळाचे पीठ 
  • २ टेबलस्पून कोकमाचे आगळ 
  • तेल  

 कृती:
  1. प्रथम बांगडा साफ करून धुवून घ्या. नंतर बांगड्याला सुरीने आडव्या चिरा द्या. नंतर कोकमाचे आगळ, १ चमचा तिखट, चिमुटभर हळद, चवीनुसार मीठ हे सर्व एकत्र करून बांगडयास १५ मिनिटे लावून ठेवावे.
  2. नंतर  बारीक रवा, तांदळाचे पीठ, चिमुटभर हळद, २ टेबलस्पून तिखट, चवीनुसार मीठ या सर्वांचे सुके मिश्रण तयार करून बांगडयास लावून, बांगडे नॉन स्टीक तव्यामध्ये दोन्ही बाजूने १०-१५ मिनिटे  Shallow फ्राय करून घ्यावेत.


Apple iPad MD328LL/A (16GB, Wi-Fi, White) NEWEST MODEL
HDE ® Facial Hair Remover Threading Beauty Tool

Friday, October 5, 2012

Papdachi Chatni Recipe | पापडाची चटणी


साहित्य :
Papadachi Chatni Recipe
  • ३-४ लिज्जत पापड  
  • किंचित लाल तिखट (आवडीनुसार)
  • मीठ चवीनुसार 
  • तेल तळण्यासाठी 
कृती :
  1. प्रथम तेल गरम करून त्यात पापड तळून घ्या. नंतर तळलेल्या पापडाचा चुरा करुन त्यात लाल तिखट, मीठ टाकून सगळे साहित्य एकत्र करा.
  2. सर्व्ह करा गरम वरण-भाता सोबत किंवा खिचडी सोबत..
टीप :
पापडाची चटणी २-३ दिवस टिकते फक्त हवा बंद डब्यात ठेवावी.


Tuesday, October 2, 2012

Raita Recipe | Boondi Raita Recipe


साहित्य :
Boondi Raita Recipe in marathi
  • १ वाटी दही 
  • किंचित काळ मीठ/ सैधव मीठ (चवीनुसार)
  • साध मीठ चवीनुसार 
  • किंचित साखर आवडत असल्यास 
  • १/२ इंच आलं 
  • १ हिरवी मिरची 
  • ३ पाने कढीपत्ता
  • १/४ टीस्पून जीर पावडर  
  • किंचित मीर पूड (आवडत असल्यास )
  • १/२ वाटी साधी बुंदी (खारी बुंदी) (आवडत असल्यास तिखट बुंदी)
  • कोथिबीर सजावटी  

कृती :
  1. एका बाउल मध्ये दही फेटून घ्या. नंतर त्यात १ वाटी पाणी टाकून रवीने ढवळून घ्या.
  2. मिक्सर मधून हिरवी मिरची, आलं, जीर पावडर, कढीपत्ता, काळ मीठ, साध मीठ, साखर बारीक वाटून घ्या.आवश्यक वाटल्यास पाणी टाका आणि ते मिश्रण दह्याच्या मिश्रणात टाकून रवीने ढवळून घ्या. रायता थंड करायला फ्रीज मध्ये ठेवा.
  3. सर्व्ह करताना त्यात बुंदी टाकून १०-१५ मिनिटे ठेवा आणि कोथिम्बिरीने गार्निश करा.

Arvi/Arbi Fry Recipe | अरवी फ्राय

साहित्य :
  1. १/२ किलो अरवी 
  2. किंचित लाल तिखट (आवडीनुसार तिखट)
  3. किंचित हळद 
  4. किंचित आमचूर पावडर
  5. १/४ टीस्पून चाट मसाला  
  6. मीठ चवीनुसार 
  7. तळण्यासाठी तेल 
  8. कोथिबीर सजावटीसाठी  
कृती :
  1. प्रथम अरवी पाण्याने धुवून घ्या. नीट वाळली की त्याची साले काढून टाकून ती डीप फ्राय (Deep Fry) करा. झाकण ठेवून डीप फ्राय करा आणि म्हणजे आरवी नीट शिजतील.
  2. नंतर अरवी तेलातून बाहेर काढल्यावर टिश्यू पेपर ठेवावी. मग ती थंड झाली की त्याला मधोमध सुरीने चीर पाडून त्यात वरील सर्व मसाले एकत्र करून ते प्रत्येक अरवीत तो मसाला भरून ती दाबून चपटी करा म्हणजे मसाला बाहेर येणार नाही.
  3. आणि पुन्हा एकदा १-२ टीस्पून तेल नॉन स्टिक कढईत टाकून ती मसाला भरलेली अरवी परतून घ्या.
  4. वरून कोथिबीरने सजवून सर्व्ह करा. चापटी किंवा खिचडी सोबत छान लागते आणि लहान मोठयांना आवडते.  As Starter पण सर्व्ह करू शकतो.
टीप :
  • अरवी उपासाला पण चालते फक्त त्यात चाट मसाला टाकू नका.
  • अरवी डीप फ्राय न करता उकडून पण घेऊ शकतो.